Elgar Parishad Case: फादर स्टेन स्वामी यांचे निधन

Elgar Parishad Case: भीमा कोरेगाव प्रकरणात तुरुंगात असलेले आदिवासी कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांचे सोमवारी निधन झाले.
Elgar Parishad Case: Stan Swamy pass away
Elgar Parishad Case: Stan Swamy pass away Dainik Gomantak
Published on
Updated on

भीमा कोरेगाव प्रकरणात (Elgar Parishad Case) तुरुंगात असलेले आदिवासी कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी (Stan Swamy) यांचे मुंबई उच्च न्यायालयात जामीन सुनावणीपूर्वी सोमवारी निधन झाले. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा यासाठी 84वर्षीय स्टॅन स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Activist Stan Swamy Passes Away Ahead of Hearing on Bail Plea)

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांचा आज सोमवारी मृत्यू झाला. ते 84 वर्षाचे होते. स्वामी अनेक आजारांनी ग्रस्त होते. गेल्या वर्षी त्याना कोविडची लागण झाली होती. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी ही माहिती दिली. आजच स्टेनच्या जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टात सुरू होती.उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान डॉ. डिसोझा यांनी त्याच्या निधनाची माहिती दिली.

1 जानेवारी 2018 रोजी पुण्याच्या भीमा कोरेगाव येथे दलित समाजातील लोकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एल्गार परिषदेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान हिंसाचार भडकला होता. जमावाने सर्व वाहने जाळली होती. दुकाने व घरे तोडण्यात आली होती. हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला होता, बरेच लोक जखमी झाले होते. या प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याबद्दल अनेकांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी एक म्हणजे स्टॅन स्वामी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com