Accused in Acid Attack case arrested by Aligarh Police after 21 years
Accused in Acid Attack case arrested by Aligarh Police after 21 yearsDainik Gomantak

"दोन दशकांपासून मी तळमळत आहे", Acid Attack प्रकरणातील आरोपीला 21 वर्षांनी अटक

"मी लहान वयातच माझे वडील गमावले होते आणि माझ्या आईवर आमच्या कुटुंबाचे पोट भरण्याचा भार होता. शिवाय, हल्लेखोर माझ्या नातेवाईक होता. त्यामुळे माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मला पोलिसांकडे जाण्याचे धैर्य झाले नाही."
Published on

Accused in Acid Attack case arrested by Aligarh Police after 21 years:

अलिगढ पोलिसांनी अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीला पकडण्यात 21 वर्षांनंतर यश आले. संबंधित आरोपीला पोलिसांनी नुकतेच अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या आरिफ (48) याला शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठवण्यात आले.

आता 35 वर्षांची असलेली रुकैया खातून फक्त 14 वर्षांची होती जेव्हा आरिफने 2002 मध्ये अलीगढ येथे रुकैयाच्या घरी तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. यानंतर तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या शरीराच्या इतर भगांवर भाजल्याच्या खुणा उमठल्या होत्या.

पीडित रुकैया म्हणाली, "मी लहान वयातच माझे वडील गमावले होते आणि माझ्या आईवर आमच्या कुटुंबाचे पोट भरण्याचा भार होता. शिवाय, हल्लेखोर माझ्या नातेवाईक होता. त्यामुळे माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मला पोलिसांकडे जाण्याचे धैर्य झाले नाही."

हा गुन्हा योगायोगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या निदर्शनास आला. डिसेंबर २०२२ मध्ये, आग्रा झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कृष्णा यांनी आग्रा येथील Sheroes Hangout कॅफेला भेट दिली, जिथे रुकैया इतर अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्यांसोबत काम करते.

यावेळी रुकैयाने तिच्यासोबत घडलेला प्रकार अधिकाऱ्याला सांगितला, त्यांनी तिला शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

जानेवारी 2023 मध्ये, कृष्णा यांच्या हस्तक्षेमुळे, आग्रा जिल्ह्यातील एतमदौला पोलीस स्टेशनने अ‍ॅसिड हल्ल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला.

Accused in Acid Attack case arrested by Aligarh Police after 21 years
"जनतेला तो अधिकार नाही," Electoral Bonds बाबत मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात मांडली बाजू

नंतर हे प्रकरण अलिगढ जिल्ह्यातील रोरावार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. या हल्ल्यात रुकैया गंभीर भाजली होती. आणि तिला दीर्घ उपचार घ्यावे लागले. तिला वर्षानुवर्षे मानसिक आघातही सहन करावा लागला. ती अजूनही आरोग्याच्या विविध गुंतागुंतांसाठी औषधोपचार घेत आहे. पण, तिने एफआयआर दाखल न केल्यामुळे तिला अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांसाठीच्या सरकारी योजनांचा लाभ घेता आला नाही.

"दोन दशकांपासून, माझे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या व्यक्तीचा बदला घेण्यासाठी मी तळमळत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरिफ माझ्या कुटुंबाला धमकावत होता. शेवटी त्याला तुरुंगात गेल्याचे पाहून समाधान वाटत आहे. ज्या महिलांविरोधात कोणताही गुन्हा घडला असेल त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे मी आवाहन करते. माझ्या अनुभवावरून मी खात्रीपूर्वक सांगू शकते की, पोलिस नक्कीच मदत करतात."

Accused in Acid Attack case arrested by Aligarh Police after 21 years
Viral Video: अखेर संयम सुटला, तहान आणि भुकेने व्याकूळलेल्या लोकांचा UNच्या धान्य गोदामांवर हल्ला

2013 पर्यंत, IPC मध्ये अ‍ॅसिड हल्ल्यांच्या विरोधात कोणतेही विशिष्ट कायदे नव्हते. त्यानंतर 2013 मध्ये आयपीसीमध्ये कलम 326A आणि कलम 326B जोडले, अशा प्रकारे वाचलेल्यांसाठी विशेष तरतुदी तयार केल्या.

या कलमांनुसार, अ‍ॅसिड हल्ल्यातील गुन्हेगारांना किमान 10 वर्षे कारावास, जन्मठेपेपर्यंत आणि दंडासह शिक्षा होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवर अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास कलम 326B अंतर्गत पाच ते सात वर्षांची शिक्षा आहे, नंतर वाचलेल्या व्यक्तीला झालेल्या दुखापतींचे स्वरूप लक्षात न घेता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com