आग्रा-लखनौ महामार्गावर मोठा अपघात 2 ठार, बाराहून अधिक जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून 50 पर्यटकांना घेऊन वाराणसीला जाणाऱ्या स्लीपर बसला इटावाजवळ अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अनेक पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले
2 killed in Agra-Lucknow highway accident
2 killed in Agra-Lucknow highway accidentDainik Gomantak
Published on
Updated on

इटावा: आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर बुधवारी पहाटे पर्यटकांनी भरलेली बस एका कंटेनरला धडकली. या अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला, तर बाराहून अधिक जखमी झाले. चौबिया भागातील चॅनल 113 वर गोपालपूर गावाजवळ हा अपघात झाला.

(accident in Agra-Lucknow highway)

2 killed in Agra-Lucknow highway accident
अहमदाबादच्या नामकरणावरून सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधान मोदींना घरचा आहेर

दिल्ली, मथुरा, आग्रामार्गे अयोध्या आणि काशीला जाणारे सर्व पर्यटक कर्नाटकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना सैफई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातून 50 पर्यटकांना घेऊन वाराणसीला जाणाऱ्या स्लीपर बसला इटावाजवळ अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच अनेक पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सर्व प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला.

मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे

इटावा रस्ता अपघातावर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जखमींवर उपचार करण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com