कोरोनाच्या दोन लाटांची दहशत बघून आणि लाखो समजावूनही काही लोक कोविड प्रोटोकॉल पाळायला अजिबात तयार नाहीत. उलट समजावल्यावर त्यांना राग येतो. असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी सांगितले की, एका 33 वर्षीय व्यक्तीने त्याची पत्नी आणि नातेवाईकांसह दोन पोलिसांसोबत (police) गैरवर्तन केले आहे. मास्क घातला नाही म्हणून त्याला थांबवले असता त्याने पिस्तुलातून पाच राऊंड फायरही केले.
कल्याण अधिकारी पदावर कार्यरत असलेले आदेश हे व्यवसायाने वकील आहेत. पोलिसांनी सांगितले की, पटपरगंज एक्स्टेंशनचा रहिवासी आदेश शनिवारी रात्री उशिरा कर्फ्यू (Curfew) दरम्यान पत्नी आणि चुलत भावासह कारमधून प्रवास करत होता. यादरम्यान सीमापुरी चौकात गस्त घालणाऱ्या एका पोलिसाने त्यांचे वाहन थांबवले आणि मास्क न लावता एवढ्या उशिरा निघण्याचे कारण विचारले. यादरम्यान बाचाबाची झाली आणि दुसरा पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने त्याच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने जमिनीवर पाच राउंड फायर केले, तर त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेने पोलिसांशी गैरवर्तन केले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनास्थळावरून काही दारूच्या बाटल्याही सापडल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे, पुढील तपास सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.