आम आदमी पक्षाने पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. करुणा राजू यांना पंजाबमध्ये ईव्हीएमची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. 'आप' नेते हरपाल सिंग चीमा यांनी स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची, कॅमेऱ्यांची लिंक उमेदवारांशी शेअर करण्याची आणि उमेदवारांना मतमोजणी केंद्रांमध्ये प्रवेश देण्याची मागणी केली आहे.
हरपाल सिंग चीमा म्हणाले, पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे, मात्र मतदान यंत्रांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याबद्दल विविध उमेदवारांनी चिंता व्यक्त केली आहे.
चीमा पुढे म्हणाले, ज्या केंद्रांवर मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत, तेथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था नाही. पटियाला येथील 'आप'चे (AAP) उमेदवार अजितपाल सिंग कोहली यांनी पटियाला शहरातील महिंद्रा कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रांसाठी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोहली यांच्या म्हणण्यानुसार, महिंद्रा कॉलेजच्या (College) इमारतीत पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात नाहीत. कॉलेजमध्ये ठेवलेल्या मशिन्समध्ये छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.