मुलगाच व्हावा म्हणून सासरच्यांचा हट्ट, संभोग करण्यासाठी सांगायचे... आरोप ऐकूण कोर्ट अवाक्

लग्नाच्या आदल्या दिवशीच, तिच्या सासरच्यांनी त्या महिलेला ‘चांगले मूल’ कसे जन्माला घालायचे याची तपशीलवार हस्तलिखित चिठ्ठी दिली होती.
High Court
High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

A woman has demanded action against her husband and father-in-law, who keep giving information about the conception of the child in the womb, insisting that she give birth to a good male child:

चांगला मुलाला जन्म दे, असा आग्रह धरत गर्भात मुलाचीच धारणा कशी होईल याबद्दत सतत माहिती देणाऱ्या पती आणि सासरच्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी एका महिलेने केली आहे.

या महिलेच्या याचिकेवर विचार करताना कोच्ची उच्च न्यायालय म्हणाले, आजच्या काळात अशा गोष्टी घडू शकतात यावर विश्वास बसत नाही.

हे प्रकरण गर्भधारणापूर्व आणि प्री-नॅटल डायग्नोस्टिक तंत्र कायद्यांतर्गत (पीसी आणि पीएनडीटी कायदा) अंतर्गत येत असल्याने, न्यायालयाने या प्रकरणी राज्य आणि केंद्राकडून निर्देश मागवले आहेत आणि पुढील सुनावणी 29 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

महिलेने आरोप केला आहे की, तिला तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबाने तिला तिच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी मुलगी नको म्हणत चांगल्या मुलाला जन्म देण्यासाठी गरोदर राहण्यासाठी 'गर्भधारणापूर्व लिंग निवड पद्धती' असलेली चिठ्ठी दिली होती.

लग्नाच्या आदल्या दिवशीच, तिच्या सासरच्यांनी त्या महिलेला ‘चांगले मूल’ कसे जन्माला घालायचे याची तपशीलवार हस्तलिखित चिठ्ठी दिली होती.

अखेरीस, तिने एका मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासून तिला तिच्या पतीच्या कुटुंबाकडून तिला छळ सहन कराव्या लागला. काही वर्षांपासून प्रयत्न करूनही न्याय न मिळाल्याने तिने शेवटी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.

High Court
Divorce: घटस्फोट घेतला म्हणून मुल आणि पालकांचे नाते संपुष्टात येत नाही, हायकोर्ट

या खटल्यातील पीडीत महिलेचे लग्न 2012 मध्ये झाले होते. तिचा दावा आहे की, लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिला तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी 'चांगला मुलगा' होण्यासाठी काही सूचनांचे पालन करण्यासाठी एक चिठ्ठी दिली होती. कारण त्यांना वाटायचे की मुलगी हा आर्थिक भार आहे.

पती व सासरच्यांनी दिलेल्या चिट्टीमध्ये, "लैंगिक संभोग करण्याची नेमकी पद्धत आणि वेळ याविषयी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. जेणेकरून 'चांगला मुलगा' होण्याची शक्यता 95 टक्क्यांनी वाढेल."

High Court
कोणते मूल दत्तक घ्यायचे हे निवडण्याचा अधिकार इच्छुक पालकांना नाही: हायकोर्ट

मात्र, २०१४ साली महिलेने कुटुंबाच्या अपेक्षेविरुद्ध एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिच्यावर सरू असलेला कौटुंबिक अत्याचार आणखी वाढल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

पती आणि त्याच्या कुटुंबाची कृती पीसी आणि पीएनडीटी कायद्याच्या तरतुदींच्या विरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com