A video of a police sub-inspector tied to a pole and stripped and beaten up in Agra, Uttar Pradesh is going viral on social media:
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका पोलीस उपनिरीक्षकाला खांबाला बांधून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गावात एका खांबाला विवस्त्र करून उत्तर प्रदेश पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका मुलीसोबत जबरदस्ती करताना पकडल्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकारी मुलीचा विनयभंग करत असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावकऱ्यांनी मारहाण केलेल्या यूपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव संदीप कुमार असे आहे. संदीप कुमारने छतावरून उडी मारली आणि मद्यधुंद अवस्थेत घरात घुसून घरात उपस्थित असलेल्या महिलाचा विनयभंग करण्यास सुरुवात केली.
मुलीने आरडाओरड केल्यानंतर मुलीचे कुटुंबीय आले आणि त्यांच्या घरात आक्षेपार्ह स्थितीत पोलिस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.
त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना बोलावले आणि संतप्त ग्रामस्थांनी संदीपकुमारला विवस्त्र करून खांबाला बांधले. त्याच्या या कृत्याबद्दल गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीची सुटका करून आरोपीला ताब्यात घेत अटक केली.
पोलीस अधिकाऱ्याला नग्न करून खांबाला बांधून स्थानिकांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दि.17 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्याने मुलीच्या घरात घुसून महिलेशी जबरदस्ती करताना तिला तिच्या कुटुंबीयांनी पकडल्याची घटना घडली.
पोलिसांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने चौकशी सुरू केलेली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओचा ते तपास करत आहेत. एतमादपूरचे पोलीस अधिक्षक एसीपी म्हणाले, "बऱ्हाण पोलिस स्टेशन अंतर्गत एका उपनिरीक्षकाला एका तरुणीसोबत पकडल्याप्रकरणी, तत्काळ निलंबित करण्यात येत आहे, कठोर विभागीय कारवाई करण्यात येत असून तक्रार प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.