Covid-19: केरळात दोन दिवस कडक संचारबंदी

कोरोना विषाणूला (Corona virus) आळा घालण्यासाठी केरळ राज्यात 31 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत लोकडाउन (Lockdown)जारी केला आहे.
Kerala has imposed a curfew from July 31 to August 1 due to the increase in corona
Kerala has imposed a curfew from July 31 to August 1 due to the increase in coronaDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona virus) दिवसेंदिवस केरळमध्ये वेगाने वाढत आहे. यामुळे कोरोना विषाणुला (Corona virus) आळा घालण्यासाठी केरळ सरकारने 31 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत राज्यात लॉकडाउन (Lockdown) जाहीर केला आहे. त्याचबरोबर केंद्राने राज्याला मदत (help) करण्यासाठी तज्ञाची टीम पाठवली आहे.

Kerala has imposed a curfew from July 31 to August 1 due to the increase in corona
पाहा दूधसागर धबधब्याचे 'Sea of Milk' रूप

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहून केरळमध्ये अलीकडेच साजरा करण्यात आलेल्या 'ईद' ला "सुपर स्प्रेडर इव्हेंट"असे वर्णन केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की कोरोनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. सण आणि सामाजिक कार्यक्रमाच्या दरम्यान कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून आपल्याला या विषाणुवर नियंत्रण ठेवता येईल. केरळ सरकारने ईद निमित्ति राज्यात लॉकडाउन शिथिल केले होते, यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती.

Kerala has imposed a curfew from July 31 to August 1 due to the increase in corona
COVID-19 Vaccine: केंद्र सरकारने आतापर्यंत दिली 100 कोटी लसींची ऑर्डर
Kerala has imposed a curfew from July 31 to August 1 due to the increase in corona
Amarnath cave: बाबा अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी

केरळ राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अचानक वाढायला आहे. केरळमधील वाढत्या कोरोना रुग्णाच्या विचारात केंद्र सरकारने राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकाच्या केंद्रीय अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची टीम केरळला पाठवली आहे. तज्ञांची ही टीम राह्य सरकारसह कोरोना विषाणुवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मानसुक मडाविया यांनी दिली आहे.

केरळ राज्यात बुधवारी कोविड-19 चे 22,056 नवे रुग्ण समोर आले आहे. यात संक्रमणाची एकूण संख्या 33,27,301 इतकी झाली आहे. तर या संसर्गामुळे 131लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ही संख्या आता 16,457 वर येवून पोहोचली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत असे म्हणातले आहे की, आतापर्यंत संसर्ग झालेल्या लोकांपैकी 17, 761 लोक बरे झाले आहेत. तर आतापर्यंत लोकांची संख्या 31, 60, 804 वर गेली आहे. राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,49,534 इतकी आहे.

या जिल्हयामध्ये अधिक रुग्ण

केरळमध्ये सर्वात जास्त मलप्पुरम 3931, त्रिशुर 3005, कोझिकोड 2400, एर्नाकुलम 2397, तिरुवनंतपुरम 1101 आणि कोट्टायम 1067 इतके केसेस आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com