नवी दिल्ली: सरकारी नोकरीसाठी तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारच्या नोकरभरतीसाठी आता देशभरात फक्त एकच ऑनलाइन परीक्षा (Common Eligibility Test) घेण्यात येणार आहे. केंद्रीय कार्मिक मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पुढच्या वर्षीपासून केंद्र सरकारच्या नोकरभरतीसाठी उमेदवारांचे स्क्रिनिंग व निवड करण्यासाठी कॉमन पात्रता परीक्षा (CET) ऑनलाईन घेतली जाईल. (A Common Eligibility Test (CET) for job aspirants will be conducted across the country from early 2022)
प्रवेश परीक्षा ही भरती सुलभ करण्यासाठी कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) हाती घेतलेली महत्त्वपूर्ण सुधारणा आहे. नोकरी शोधणाऱ्यांसाठी, विशेषत: दुर्गम भागात राहणार्यांसाठी हा निर्णय एक वरदान ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक सहकार्याने हा अनोखा उपक्रम यंदा सुरू करण्यात येणार होता, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे त्याला उशीर झाला आहे, असे मत आय.ए.एस. अधिकार्यांच्या सिव्हिल लिस्ट 2021 च्या ई-बुकच्या प्रक्षेपणानंतर डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
एनआरएची स्थापना
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सामान्य पात्रता चाचणी घेण्यासाठी राष्ट्रीय भरती एजन्सी (NRA) ची स्थापना करण्यात आली आहे. एनआरए सरकारी क्षेत्रातील नोकरीसाठी सीईटी / शॉर्टलिस्ट उमेदवारांची परीक्षा घेईल, त्यासाठी भरती सध्या कर्मचारी निवड आयोग (SSC), रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (IBPS) च्या माध्यमातून केली जाते.
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असेल
डॉ. जितेंद्रसिंग म्हणाले की एनआरए ही एक बहु-एजन्सी संस्था असेल जी गट-'बी' आणि 'सी' (नॉन-टेक्निकल) पदांसाठी उमेदवारांची सामान्य परीक्षा घेईल. या सुधारणेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असेल ज्यामुळे दुर्गम भागात राहणाऱ्या उमेदवारांना चांगलीच मदत होईल. या ऐतिहासिक सुधारणांमुळे सर्व उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी किंवा सामाजिक-आर्थिक स्थिती विचारात न घेता सरकारी भरतीत समान संधी मिळू शकेल. महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी आणि भरती परीक्षेसाठी दूरदूरच्या परीक्षा केंद्रावर जाण्यास असमर्थ असणा-यांनाही याचा मोठा फायदा होणार असल्याचे डॉ. जितेंद्रसिंग यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.