अमृतसर-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गाजवळील दीदा सानिया गावात विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यटक बसचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचा तोल गेला आणि बस शेतात पलटी झाली. विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून नागरिक घटनास्थळी पोहोचले. कसेबसे त्यांनी बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या अपघातात 12 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस (police) पथकाने विद्यार्थ्यांना सिंघोवाल रुग्णालयात दाखल केले. सुमारे 12 विद्यार्थ्यांना गुरुदासपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, काळजी करण्यासारखे काही कारण नाही.
गुरुदासपूरमध्ये शेतात बस उलटली
या अपघातात 12 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकाने विद्यार्थ्यांना सिंघोवाल रुग्णालयात नेले. सुमारे 12 विद्यार्थ्यांना गुरुदासपूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Hospital) रेफर करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, काळजी करण्यासारखे काही नाही.
विद्यार्थ्यांना (Student) किरकोळ दुखापत झाली. बसमध्ये 29 विद्यार्थी आणि दोन शिक्षक केरळहून मनालीला जात होते. बस ड्रायव्हर सुगारिएव म्हणतो की तो बस सावधपणे चालवत होता. तेवढ्यात बससमोर एक गाय आली. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात बसचा तोल गेला आणि ती शेतात पलटी झाली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.