Rahul Sonia Gandhi
Rahul Sonia GandhiDainik Gomantak

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका; ज्येष्ठ नेत्यानं केलं पक्षाला ‘गुड बाय’

काँग्रेसचं राष्ट्रीय चिंतन शिबीर असतानाच; ठोकला राजीनामा
Published on

मार्च अखेर पाच राज्यातील विधानसभा निकालाअंती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची घोर निराशा झाली होती. कारण काँग्रेस विजयाच्या आरोळ्या ठोकत असताना हाती मात्र काहीच लागले नाही. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय पातळीवरील चिंतन शिबीर सुरू आहे. (A big blow to the Congress in Punjab, the senior leader said ‘good bye’ to the party )

Rahul Sonia Gandhi
तब्बल 19 तासांनंतर मुंडका घटनास्थळी मुख्यमंत्री केजरीवाल दाखल

कारण अशा वेळी पंजाबमध्ये काँग्रेसच्या काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील जाखर पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी “गुडलक आणि गुडबाय” असं म्हणत हा रामराम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वीच सुनील जाखर यांच्यावर पक्षानं शिस्तभंगाची कारवाई करत दोन वर्षांसाठी पक्षातील सर्व पदांपासून दूर राहाण्याचे निर्देश दिले होते.

Rahul Sonia Gandhi
त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांनी दिला राजीनामा

आधीच पक्षावर नाराज असलेल्या सुनील जाखर यांनी अखेर आज फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी न दिल्याबद्दल जाखर पक्षावर नाराज होते. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पराभवासाठी चरणजीतसिंग चन्नी यांनाच दोषी धरलं होतं. त्यावरून पक्षानं कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.ज्येष्ट नेत्या सोनिया गांधी यांनी पक्षातील नेत्यांना हीच वेळ आहे पक्षासाठी काहीतरी करण्याची असं म्हटलं होतं. मात्र तरीही काँग्रेसची ही स्थिती अद्याप जैसे थे आहे.

काय सुरु आहे काँग्रेसच्या चिंतन शिबिरमध्ये

राजस्थानमधील उदयपूरमध्ये सद्या काँग्रेसचे चिंतन शिबिर सुरु आहे. या चिंतन शिबिरात विविध मुद्यांवर चर्चा सुरु आहे. संघटनात्मक बांधणीवर विषेश भर देण्याच्या संदर्भाने काँग्रेस काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रसचं नेतृत्व तरुणांना संधी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरील समितीपासून कार्यकारिणीपर्यंत 50 टक्के प्रतिनिधित्व हे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कार्यकर्त्यांकडे देण्याच्या संदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. तसेच तरुणांना रोजगार देण्याच्या मुद्यावरही या चिंतन शिबिरात चर्चा सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com