वडिलांच्या अपघातानंतर 7 वर्षाचा मुलगा बनला डिलिव्हरी बॉय, Video Viral

Video Viral: मजबुरी माणसाला काहीही करायला लावते.
Son
SonDainik Gomantak

Video Viral: मजबुरी माणसाला काहीही करायला लावते. तथापि, समस्या कितीही मोठी असो, धैर्य असेल तर ती शुल्लक वाटायला लागते. वडिलांच्या अपघातानंतर डिलिव्हरी बॉय बनलेल्या शाळेत जाणाऱ्या मुलाबद्दल असेच काहीसे घडले आहे. राहुल मित्तल नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला असून तो मुलगा सात वर्षांचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो रात्री 11 वाजेपर्यंत सायकलवरुन काम करतो.

दरम्यान, ट्विटरवर 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक या मुलाला सलाम करत आहेत. त्याची स्तुती करत आहेत. व्हिडिओमध्ये, जेव्हा त्या व्यक्तीने मुलाला प्रश्न विचारला, तेव्हा तो सांगतो की, 'माझ्या वडिलांचा अपघात झाला आहे. त्यामुळे ते काम करु शकत नाही. अशा स्थितीत मी रोज सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सायकलवरुन डिलिव्हरीचे काम करतो.'

Son
Gujarat मध्ये गरब्यावरुन गदारोळ, नेमका काय आहे GST चा संपूर्ण वाद

दुसरीकडे, व्हिडिओ पोस्ट करत राहुल मित्तल यांनी ट्विटरवर लिहिले की, "हा 7 वर्षांचा मुलगा अपघातानंतर वडिलांचे काम करत आहे. सकाळी शाळेतही जातो. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर झोमेट डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. अशा मुलाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याचबरोबर वडिलांना मदतीची गरज आहे जेणेकरुन ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.'' मित्तल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये झोमॅटोलाही (Zomato) टॅग केले आहे.

Zomato ने मुलाला मदत केली

राहुल मित्तलच्या या पोस्टवर झोमॅटोने मेसेजमध्ये तपशीलवार माहिती पाठवण्यास सांगितले. झोमॅटोने मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले. राहुल मित्तलने व्हिडिओ पोस्टमध्ये उत्तर दिले की, 'Zomato ने मुलाच्या वडिलांचा आयडी फ्रीज केला आहे त्यामुळे ते काम करु शकत नाहीत. Zomato ने मुलाला आर्थिक मदत केली आहे. त्याचे वडील अपघातामधून बरे होताच Zomato त्यांचा आयडी अनफ्रीझ करेल.'

Son
Assam पोलिसांची मोठी कारवाई; मदरशात द्यायचा जिहादी प्रशिक्षणाचे धडे

बालमजुरीचा प्रश्न लोक उपस्थित करत होते

एकीकडे लोक मुलाचे कौतुक करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे, काही लोकांनी बालमजुरीचा प्रश्नही उपस्थित केला आहे. अनेक युजर्स म्हटले की, 'इतक्या लहान मुलाला असे काम करायला लावणे योग्य नाही. त्यामुळे त्याच्या शिक्षणावर परिणाम होईल. Zomato ने त्याला मदत केली पाहिजे.' त्याचप्रमाणे, इतर अनेक यूजर्संनी देखील मित्तलच्या पोस्टवर मुलाची माहिती विचारली जेणेकरुन ते त्याला मदत करु शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com