57th GST Council Meeting: जीएसटी अधिकाऱ्यांच्या अटक अधिकारांवर मर्यादा; कायदेशीर कारवाईची मर्यादा 1 कोटींवरून 5 कोटींवर

57th GST Council Meeting Decisions: परिषदेने ‘जीएसटी’च्या दरांमध्ये बदल करण्याऐवजी व्यवसायांचे सुलभीकरण आणि नियमांच्या पालनाचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने सुधारणांवर भर दिला आहे.
57th GST Council Meeting Decisions
57th GST Council MeetingDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) अधिकाऱ्यांचे करदात्यांना अटक करण्याचे अधिकार रद्द करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठीची मर्यादा एक कोटी रुपयांवरून वाढवून पाच कोटी रुपये करण्यासह आज  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५७ व्या ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. 

‘‘परिषदेने ‘जीएसटी’च्या दरांमध्ये बदल करण्याऐवजी व्यवसायांचे सुलभीकरण आणि नियमांच्या पालनाचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने  सुधारणांवर भर दिला आहे,’’ असे भारत मंडपम  येथे झालेल्या बैठकीनंतर सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले.  आजच्या बैठकीतील निर्णयानुसार करदात्याच्या किमान शिक्षेची अट हटविण्यात आली आहे. प्रत्येक प्रकरणात दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्हींबाबत निर्णय घेण्याचे अधिकार न्यायालयाला देण्यात आले आहेत.

57th GST Council Meeting Decisions
FC Goa ISL Squad: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची उपस्थिती

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ५७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावली. या बैठकीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जीएसटीसंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

महत्त्वाचे प्रस्ताव मार्गी 

‘जीएसटी’ परिषद आता वर्षातून एकदाच कराचे दर बदलेल

नोंदणी नसलेल्या डिलिव्हरी बॉईज/रायडर्स सेवांवरील जीएसटी ५ टक्के 

एक एप्रिल २०२७ पासून बँकांना सोन्यासह इतर मौल्यवान धातूंच्या आयातीवर तीन टक्के ‘आयजीएसटी’ द्यावा लागणार

पात्र व्यापाऱ्यांना आउटडोअर केटरिंगवरील ‘जीएसटी’साठी इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ मिळून कंपन्यांचा खर्च कमी होणार.

57th GST Council Meeting Decisions
Goa Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com