IT Professionalsसाठी नोकरीच्या संधीत 400% वाढ

BFSI उद्योगाद्वारे वाढवलेल्या दबावामुळे संध्या या क्षेत्रात कौशल्यापुर्ण व्यक्तीमत्वांची मागणी वाढली आहे
IT Professionalsसाठी नोकरीच्या संधीत 400% वाढ

भारतभरातील (India) कंपन्यांसाठी तंत्रज्ञान परिवर्तन हे एक नोकरीसाठी प्रमुख प्राधान्य बनले आहे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांसाठी (IT Professional) नोकरीच्या संधी जवळपास 400%वाढल्या आहेत. एका अहवालानुसार, BFSI उद्योगाद्वारे वाढवलेल्या दबावामुळे कौशल्यापुर्ण व्यक्तीमत्वांची मागणी वाढते आहे.

क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर टेक डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर, रिअ‍ॅक्ट जेएस डेव्हलपर, अँड्रॉइड डेव्हलपर आणि अँग्युलर जेएस डेव्हलपर यासह तांत्रिक कौशल्यांच्या प्रतिभेची मागणी गेल्या तिमाहीपासून वाढली आहे.

IT Professionalsसाठी नोकरीच्या संधीत 400% वाढ
देशात साखळी बॉम्ब स्फोटाचा कट, दहशतवाद्यांच्या चैकशीत मोठे खुलासे

सूचीबद्ध शीर्ष कौशल्यांव्यतिरिक्त, गेमिंग (युनिटी डेव्हलपर्स), डेवॉप्स (बांबू, जिरा) आणि प्लॅटफॉर्म (सेल्सफोर्स, एसएपी हाना) मध्येही कौशल्याच्या मागणीत वाढ झाली आहे.

भारतभरातील नोकरभरती क्रियाकलापांवर प्रामुख्याने IT हब्स बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांचे वर्चस्व होते, त्यानंतर चेन्नई, मुंबई, NCR आणि इतर प्रमुख शहरांचा नंबर लागतो.

बेंगळुरूमध्ये सर्वाधिक म्हणजे (40%), त्यानंतर हैदराबाद (18%) आणि पुणे (18%) मागणी आहे. कौशल्यानुसार ब्रेक-अपमध्ये असे दिसून आले की बेंगळुरूने क्लाउड टेक डेव्हलपर्स (41%), रिएक्ट जेएस डेव्हलपर्स (44%) आणि अँड्रॉइड डेव्हलपर्स (81%) ची मागणी करतांना आपल्या मागणीचा दर्जा ही वाढवला आहे.

IT Professionalsसाठी नोकरीच्या संधीत 400% वाढ
5G स्पेक्ट्रम लिलावाबाबत मंत्र्याचं मोठं वक्तव्य; पॅकेजच्या 9 प्रमुख घोषणा

फुल स्टॅक डेव्हलपर्ससाठी, बेंगळुरू (42%) आणि हैदराबाद (37%) मध्ये जवळपास समान मागणी दिसून आली, तर अँग्युलर जेएस डेव्हलपर्सची मागणी हैदराबाद (25%), बेंगळुरू (21%), गुरुग्राम (21%) मागणीमध्ये समान प्रमाणात वितरीत करण्यात आली. , चेन्नई (16%) आणि पुणे (13%) यामध्येच सहभागी करण्यात आले.

अहवालासाठीचा डेटा कंपनीच्या अॅप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीममध्ये तयार केलेल्या अल्गोरिदममधून काढण्यात आला आहे, जो मार्च-ऑगस्ट 2021 च्या तुलनेत ऑक्टोबर-मार्च 2020-2021 च्या कालावधीत काही प्रमाणात जुळता मिळता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com