अंदमान (Andaman) आणि निकोबार (Nicobar) बेटांवर आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (National Centre for Seismology) ही माहिती दिली. तर मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजण्यात आली आहे. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे भूकंपामुळे कोणाचीही हानी झालेली नाहीये. भूकंपाच्या केंद्राबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. (4.9 magnitude earthquake shakes Andaman and Nicobar Islands)
भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांनी घराबाहेर पडायला सुरुवात केली. या भूकंपांच्या धक्क्यांमध्ये जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती सध्यातरी मिळालेली नाहीये. लडाखमध्ये (Ladakh) झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल होती. बुधवारी सकाळी 10.24 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कारगिलच्या उत्तरेस 328 किमी अंतरावर हे धक्के जाणवले आहेत.
हिमालय पर्वत रांगेतही भूकंपाचा धोका
उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. बरकोट पुरोळा येथे भूकंपाचे धक्के जाणवले आणि तेव्ह पासूनच लोकांनी घराबाहेर पडायला सुरुवात केली. उत्तरकाशी येथे दुपारी 4.52 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी नोंदवली गेली. शास्त्रज्ञांनी सांगितले की, हिमालयाच्या पर्वतराजीत छोट्या भूकंपांच्या दरम्यान कधीही मोठा भूकंप जानवु शकतो. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8 पेक्षा जास्त असू शकते असा शास्त्रज्ञांनी सांगितले होते. त्यामुळे आजूबाजूच्या दाट लोकवस्तीच्या भागात मोठा विध्वंस होऊ शकतो, असा दावाही केला जात आहे. हा मोठा रिश्टर स्केलचा भूकंप कधी होणार, याचा अंदाज मात्र अद्याप लावलेला नाहीये.
जपान तसेच तैपेईमध्येही पृथ्वी हादरली
आणि त्याचवेळी, तैवानची (Taiwan) राजधानी तैपेई येथे गेल्या महिन्याच्या अखेरीस भूकंपाचे धक्के जाणयला सुरुवात झाली. राजधानी तैपेईच्या दक्षिणेला सुमारे 182 किलोमीटर अंतरावर भूकंप झाला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.7 इतकी नोंदवली गेली आहे. त्याच वेळी, जपानची (Japan) राजधानी टोकियोजवळ (Tokyo) नुकत्याच झालेल्या भूकंपामुळे बराच विध्वंस झाला. भूकंपामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, तर 88 जण जखमी झाले आहेत. तेथे बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने भूकंपाची तीव्रता किती आहे, याचा अंदाज तर येतो. जपानच्या हवामान खात्याने सुनामीचा इशारा देखील दिला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.