अरबी समुद्रात कमी दाब निर्माण झाल्यामुळे झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी मोठा फटका बसला आहे, या पावसामुळे केरळमध्ये (Kerala Rain) सर्वात जास्त नुकसान झालेले पाहायला मिळालं, कारण केरळमध्ये जीवितहानी झाली आहे. केरळ राज्यातील अनेक भागात या पावसाने चार जणांचा बळी गेला आहे . सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे (Kerala Floods). या मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक नद्यांना पूर आला आहे त्याचबरोबर जवळपास सारे धरणे भरली आहेत , याचाच परिणाम नदीकाठ आणि सखल भागात अनेक ठिकाणी पूराचा फटका बसला आहे मात्र प्रशासनाने त्याठिकाणी बचावकार्य सुरू करून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले आहे. (4 dies cause heavy rains in Kerala red alert in state)
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे एका घराची भिंत कोसळल्यानंतर मलप्पुरम जिल्ह्यातील करीपूर येथे दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . कोल्लममध्ये, 65 वर्षीय व्यक्तीचाही नदीत पडून मृत्यू झाला आणि सोमवारी पंडलममध्ये दुचाकीवर झाड पडल्याने एका स्थानिक पत्रकाराचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भारतीय हवामान विभागाने गुरुवारपर्यंत प्रशासनाने सहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि चार जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर, मच्छीमारांना हवामान ठीक होईपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे आणि प्रवाशांना डोंगराळ भागात रात्रीचा प्रवास टाळायला सांगितले आहे. जिल्हा प्रशासनाने 14 ऑक्टोबरपर्यंत इडुक्कीमध्ये रात्रीच्या प्रवासाला बंदी घातली आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात अनेक भूस्खलन झाले आहेत.
त्याचबरोबर केरळमधील कोल्लम, कोची आणि कोझीकोड जिल्ह्यातील अनेक भागात पाणी साचल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे अलाप्पुझा जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि भूस्खलनानंतर कोल्लम-चेंगोटा रेल्वे लाईन सेवा बंद करण्यात आली होती. आयएमडीने म्हटले आहे की अंदमान खाडी आणि अरबी समुद्रातील अनेक हवामान बदलामुळे मुसळधार पाऊस पडत आहे आणि शुक्रवारपर्यंत तो सुरूच राहील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.