Watch Video: PM Modi यांच्या गावात सापडली 2800 वर्ष जुनी वस्ती, आतापर्यंत समोर आले एक लाखाहून अधिक अवशेष

PM Modi's Village: "ही सर्व आक्रमणे नेमक्या त्याच वेळी झाली जेव्हा कृषीप्रधान भारतीय उपखंड जोरदार मान्सूनने समृद्ध होता, परंतु मध्य आशिया अत्यंत कोरडा आणि निर्जन होता."
2800-year-old settlement found in PM Narendra Modi's village Vadnagar.
2800-year-old settlement found in PM Narendra Modi's village Vadnagar.X, ANI
Published on
Updated on

2800-year-old settlement found in PM Narendra Modi's village Vadnagar, more than one lakh ruins discovered so far:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या मूळ गावात 2800 वर्ष जुन्या वस्तीचे अवशेष सापडले आहेत. यावर आयआयडी खरगपूर येथील भूविज्ञान आणि भूभौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ.अनिंद्य सरकार म्हणाले की, आम्ही गेल्या चार वर्षांपासून वडनगरमध्ये एएसआयसोबत काम करत आहोत. आम्हाला यातून एका खूप जुन्या बौद्ध मठाची ओळख झाली.

ASI 2016 पासून यावर काम करत आहे. जागेवर 20 मीटर खोदकाम करण्यात आले आहे. वडनगरचा इतिहास खूप जुना आहे. ते म्हणाले की सात सांस्कृतिक स्तर शोधले गेले आहेत, सर्वात जुने 2800 वर्षे आणि 800 ईसापूर्व आहे.

पुरातत्व पर्यवेक्षक मुकेश ठाकोर यांनी सांगितले की, पीएम मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून वडनगरमध्ये उत्खनन सुरू आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक अवशेष सापडले आहेत. या सभ्यतेकडे पाहिल्यावर असे दिसते की येथील जलव्यवस्थापन व्यवस्था आणि पाण्याची पातळी चांगली असावी. वडनगरमध्ये आतापर्यंत सुमारे ३० ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. साइटवरील पुरावे असे सूचित करतात की येथे अनेक धर्मांचे लोक मोठ्या सुसंवादाने राहत होते.

2800-year-old settlement found in PM Narendra Modi's village Vadnagar.
Video: ''पीएम मोदी राक्षस आहेत, सर्वांना गिळून टाकतील...''; जेडीयू पक्षाच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

IIT खरगपूर येथील भूगर्भशास्त्र आणि भूभौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अनिंद्य सरकार यांनी सांगितले की, वडनगरमधील सखोल पुरातत्व उत्खननाचा अभ्यास हे दर्शवतो की, या 3,500 वर्षांच्या कालावधीत मध्य आशियाई योद्ध्यांनी विविध साम्राज्यांचा उदय आणि पतन व भारतावर वारंवार हल्ले आणि आक्रमणे झाली होती.

2800-year-old settlement found in PM Narendra Modi's village Vadnagar.
Indigo Flight Update: इंडिगोचा मोठा निर्णय, एका मोठ्या शहरातून गोवा थेट विमानसेवा अनिश्चित काळासाठी बंद

ते पुढे म्हणाले, "आमच्या समस्थानिक डेटा आणि वडनगर येथील सांस्कृतिक कालखंडातील तारखा दर्शवतात की, ही सर्व आक्रमणे नेमक्या त्याच वेळी झाली जेव्हा कृषीप्रधान भारतीय उपखंड जोरदार मान्सूनने समृद्ध होता, परंतु मध्य आशिया अत्यंत कोरडा आणि निर्जन होता, जेथे बारा महिने दुष्काळ असायचा, म्हणून तिथून जवळपास सर्व आक्रमणे आणि स्थलांतर झाले."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com