Indigo Flight Update: विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. इंडिगोने रांची-गोवा थेट विमानसेवा मंगळवारपासून (16 जानेवारी) अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.
प्रवासी संख्या कमी असल्याने सेवा सध्या थांबवण्यात आली असून, येत्या काही दिवसांत विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, असे इंडिगोच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
खराब हवामानामुळे गेल्या दोन दिवसांपासून बुकिंग होत नाही. गेल्या वर्षी 27 मार्चपासून रांची ते देवघर थेट विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, रांची-देवघर फ्लाइटमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीट्स बुकिंग कमा होत आहे, असे इंडिगोच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
दिल्लीहून रांचीला जाणाऱ्या विस्तारा विमानाला खराब हवामानाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वाराणसीमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
थंडीमुळे विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे इंडिगोची बेंगळुरू-रांची-पुणे फ्लाइटही रद्द करण्यात आली आहे.
तसेच, इंडिगोची दुसरी फ्लाइट पाटणा-रांची देखील रद्द करण्यात आली. यासोबतच दिल्लीतील दाट धुक्यामुळे दिल्लीहून रांचीला येणाऱ्या विमानांना बिरसा मुंडा विमानतळावर 1 ते 3 तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानासाठी तासनतास विमानतळावर थांबावे लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.