Karnataka: डिलिव्हरी बॉयचा खून; मृतदेह गोणीत भरून फेकला रेल्वे रूळावर, कारण काय?

पोलिसांना मृतदेह रेल्वे रुळावर सापडला असून आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली.
Karnataka
KarnatakaDainik Gomantak
Published on
Updated on

डिलिव्हरी बॉय सात फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याने त्याचा भाऊ मंजू नाईक यांनी अर्सेकेरे पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांना मृतदेह रेल्वे रुळावर सापडला असून आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

(20 year old man allegedly killed a Flipkart delivery partner who came to deliver an iPhone at Karnataka’s Haasan district)

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, आयफोनची ऑर्डर देण्यासाठी पैसे नसल्याने आरोपीने डिलिव्हरी बॉयवर चाकूने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हासन जिल्ह्यातील अर्सेकेरे येथील लक्ष्मीपुरम येथील रहिवासी हेमंत दत्ता यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला फ्लिपकार्टद्वारे आयफोन ऑर्डर केला होता. डिलिव्हरी एजंट म्हणून काम करणारा हेमंत नाईक सात फेब्रुवारीला फोन डिलिव्हरी करण्यासाठी आरोपीच्या घरी आला.

फोन डिलिव्हरी करत असताना पैसे देण्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली आणि दत्ताने नाईक यांच्यावर चाकूने वार केले. नाईक यांचा जागीच मृत्यू झाला असून दत्ताने मृतदेह गोणीत लपवून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन दिवसांनंतर दत्ताने बॅग जवळच्या रेल्वे ट्रॅकवर फेकून दिली आणि नंतर पेट्रोल टाकून मृतदेह पुरला.

Karnataka
माफिया डॉन मुख्तार अन्सारीची सून निखतच्या iphone मध्ये सापडले विदेशी नंबर; पोलिसांनी केली 8 तास चौकशी

डिलिव्हरी बॉय सात फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याने त्याचा भाऊ मंजू नाईक यांनी अर्सेकेरे पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांना मृतदेह रेल्वे रुळावर सापडला असून आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती मिळाली नसून, असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com