पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांवर गोळीबार..शिवसेना लढवणार पश्‍चिम बंगालची निवडणूक

2 BJP leaders attacked allegedly by goons of the Trinamool Congress in separate parts of West Bengal
2 BJP leaders attacked allegedly by goons of the Trinamool Congress in separate parts of West Bengal
Published on
Updated on

कोलकता :  पश्‍चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत चालले असून हिंसाचाराच्या घटना देखील वाढत चालल्या आहे. काल रात्री आसनसोल आणि माल्डा येथे भाजप नेत्यांवर गोळीबार झाल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यामागे सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. माल्दा जिल्ह्याच्या समसी येथे भाजपचे मंडळ अध्यक्ष साबेक अली यांच्या गाडीवर हल्ला करत गोळीबार केला.

साबेक यांच्या हाताला गोळी लागली आहे. त्यांना माल्डाच्या मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल केले आहे. रुता येथून पक्षाची बैठक आटोपून ते घरी परतत असताना रात्री दहाच्या सुमारास साबेक यांच्यावर गोळी झाडण्यात आली. दुसरी घटना आसनसोनलजवळील बर्नपूरच्या हीरापूर येथे झाली. दुसऱ्या घटनेत भाजप प्रदेश समितीचे सदस्य कृष्णेंदू मुखर्जी यांच्यावर रविवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानासमोरच अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या हल्ल्यातून मुखर्जी बचावले.  दरम्यान, तृणमूल कॉंग्रेसने मुखर्जी यांच्यावरील हल्ल्यात सहभागी असल्याचा इन्कार केला आहे. मुखर्जी यांच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला झाला असावा, असे टीएमसीने म्हटले आहे.

पश्‍चिम बंगालची निवडणूक शिवसेना लढवणार 

पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना लढविणार आहे. यासाठी अमरा बंगाल, उत्तर बंगा समाज पक्ष आणि उत्तर बंगा आदिवासी परिषद या पक्षांशी युती करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे राज्यातील सरचिटणीस अशोक सरकार यांनी सोमवारी दिली. झारग्राम येथील अजून एक पक्ष आघाडीत समाविष्ट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील ही आघाडी विधानसभा निवडणुकीत १०० उमेदवार उतरवेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com