Viral Video: 150 वर्षांत भारतीय रेल्वे किती बदलली? व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Indian Railways: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लोकांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो.
Indian Railways
Indian RailwaysDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Railways: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी लोकांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो. सोशल मीडियावर असे व्हिडिओ सर्रास पाहायला मिळतात. पण 100 पैकी एकच व्हिडिओ असा असतो जो पाहिल्यानंतर आपण सुखावून जातो. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भारतीय रेल्वेने गेल्या 150 वर्षांत केलेली प्रगती क्षणार्धात समजेल. चला तर मग या व्हिडिओबद्दल जाणून घेऊया...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही रेल्वे कर्मचारी स्टीम इंजिन ट्रेनमध्ये बसले आहेत आणि एक व्यक्ती इंजिन चालवण्यासाठी आगीत कोळसा टाकत आहे. काही वेळाने, व्हिडिओ बनवणारी व्यक्ती बाहेर कॅमेरा दाखवते आणि वाफेच्या ट्रेनचे इंजिन आणि दुसरा ट्रॅक दाखवते. काही वेळानंतर, असे दृश्य कॅमेऱ्यात कैद होते जे तुम्हाला सहसा कुठेही पाहायला मिळणार नाही. काही वेळाने भारतीय रेल्वेची अत्याधुनिक वंदे भारत ट्रेन जवळच्या ट्रॅकवर येताना दिसते. दोन्ही गाड्या एकमेकांच्या जवळून जतात. हे दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की, 150 वर्षांत भारतीय रेल्वेने किती प्रगती केली आहे.

Indian Railways
Viral Video: रामलल्लाची अनोखी भक्ती! रामभक्ताने पाठीवर काढला राम मंदिराचा टॅटू; व्हिडिओ पाहून लोक थक्क

लोकांना आठवला 'शोले' चित्रपट

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @nehakanand नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे. त्याने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'रेवाडीमध्ये एक वाफेचे इंजिन आणि वंदे भारत एक्सप्रेस एकमेकांना ओलांडतात. त्यांच्यातील 150 वर्षांचे जनरेशन गॅप ही ऐतिहासिक कामगिरी आहे. भारताने केलेली प्रगती दाखवणारे शेवटचे काही क्षण एकमेकांना ओलांडताना खरोखरच छान आहेत. वाफेवर चालणारे इंजिन पाहणे देखील जुन्या आठवणीसारखे आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले - वाफेचे इंजिन पाहून मला शोले चित्रपटाची आठवण झाली. दुसऱ्या यूजरने लिहिले - शोले आठवला, जय आणि वीरु मागे असावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com