1.25 lakh cash found with beggar who died of hunger in Gujarat's Valsad:
खिशात लाखो रुपये असतानाही एक भिकारी भुकेने मरण पावल्याची घटना समोर आली आहे. मृताच्या शवविच्छेदन अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
गेली 2 दिवस हा भिकारी एका लायब्ररीबाहेर पडून होता, पण त्याला दवाखान्यात नेण्याइतकीही माणुसकी कोणी दाखवली नाही. शेवटी त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण गुजरातमधील वलसाड भागातील आहे.
हा प्रकार पाहून काहींनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. झडतीदरम्यान भिकाऱ्याच्या खिशात ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. ही रक्कम जवळपास १.२५ लाख रुपये इतकी होती.
ही घटना 2 दिवस जुनी आहे, पण जेव्हा मृताच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण भूकच असल्याचे समोर आले तेव्हा पोलीस कर्मचारीही चक्रावून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय सुमारे 50 वर्षे आहे, परंतु तो कोण आहे आणि तो कुठला आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही.
लोकांनी पोलिसांना फोन केल्यावर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा झाला होता.
रविवारी एका दुकानदाराने 108 वर फोन करून माहिती दिली की, गांधी लायब्ररीजवळ रस्त्याच्या कडेला एक भिकारी गेल्या काही दिवसांपासून तशाच अवस्थेत पडून आहे.
पूर्वी त्याच्या शरिराची हालचाल होती, पण फोन केला तेव्हा त्याची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने त्यांनी 108 क्रमांकावर फोन केला. दुकानदाराचे म्हणणे ऐकून रुग्णवाहिका चालकाने पोलिसांनाही बोलावले.
वलसाड रुग्णालयामध्ये आपत्कालीन सेवा देणारे डॉ. भावेश पटेल आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. भिकाऱ्याची हालचाल होत नसल्याचे दुकानदाराने त्यांना सांगितले.
पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह ताब्यात घेण्यात आला. झडतीदरम्यान 1.14 लाखांची रोकड सापडली. 500 रुपयांच्या 38 नोटा, 200 रुपयांच्या 83 नोटा, 100 रुपयांच्या 537 नोटा आणि 20 आणि 10 रुपयांच्या नोटा होत्या. मृताच्या स्वेटरच्या खिशात प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत ही रोकड होती.
वलसाड सिव्हिल रुग्णालयाचे डॉ. कृष्णा पटेल यांनी सांगितले की, या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांनी चहा मागवला. आम्हाला वाटले की, त्याला भूक लागली आहे आणि त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आहे. आम्ही सलाईन टाकून उपचार सुरू केले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. त्याची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.