देशात या ठिकाणी बोलल्या जातात तब्बल 107 भाषा

भारतात जेवढ्या जाती , धर्म, वंश, प्रांत आहेत त्याहून कित्येक पटीने अधिक भाषा (languages) बोलल्या जातात हे ही तितकच खर .
107 languages ​​are spoken in Bengaluru in Karnataka
107 languages ​​are spoken in Bengaluru in KarnatakaDainik Gomantak
Published on
Updated on

आपला भारत (INDIA) देश हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात अनेक लोक (Indians) सोख्यने नांदतात. त्याचमुळे भारतात जेवढ्या जाती , धर्म, वंश, प्रांत आहेत त्याहून कित्येक पटीने अधिक भाषा (languages) बोलल्या जातात हे ही तितकच खर . आपल्या देशात प्रत्येक बारा मैलावर भाषा बदलते असं म्हटलं जातं. पण कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरु (Bengaluru) जिल्ह्यामध्ये तब्बल 107 भाषा बोलल्या जातात हे सांगितलं तर कुणाला पटेल का? पण ही गोष्ट खरी आहे. 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर बंगळुरु शहर आणि जिल्ह्यामध्ये 107 भाषा बोलल्या जात असल्याचं समोर आले आहे. (107 languages ​​are spoken in Bengaluru in Karnataka)

राजधानी बंगळुरुमध्ये बोलल्या जाणाऱ्या 107 भाषांमध्ये 22 अनुसूचित आणि 84 गैर अनुसूचित या भाषांचा समावेश आहे. ब्रुकिंग इन्स्टिट्यूशनच्या सिनियर फेलो शमिका रवी आणि भारतीय सांख्यिकी संस्थेचे अर्थशास्त्र विभागाचे प्रोफेसर मुदित कपूर यांनी हे विश्लेषण केले असून बंगळुरात एकूण 44 टक्के लोक हे कन्नड भाषा बोलतात हे सुद्धा या आवाहलातून समोर आले आहे.तसेच 15 टक्के लोक हे तामिळ भाषा, 14 टक्के लोक हे तेलुगु तर 6 टक्के लोक हे हिंदी भाषा बोलतात.

107 languages ​​are spoken in Bengaluru in Karnataka
Happy Teachers Day 2021: डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबाबत या खास गोष्टी

तर दुसरीकडे यानंतर नंबर लागतो तो नागालँडचा नागालँडमधील दीमापूर या ठिकाणी 103 भाषा बोलल्या जातात तर आसाममध्ये 101 भाषांचा वापर केला जातो. तर पद्दुचेरी, बिहारचे कैंमुर, उत्तर प्रदेशातील कोशाम्बी, कानपूर आणि तामिळनाडूतील अरियालूर या ठिकाणी सर्वात कमी भाषा बोलल्या जातात. या ठिकाणी 20 पेक्षा कमी भाषा बोलल्या जातात असे या माहितीतून समोर येत आहे. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहत असतील तर त्या ठिकाणच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर इतर ठिकाणापेक्षा या ठिकाणी रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होतात, त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूतहोण्यास मोठी मदत होते.

तसेच विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये 600 हून अधिक भाषा बोलल्या जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com