Panjim Yog Setu: योगपथावरून परशुरामाकडे

पणजीतील मांडवीच्या तीरावर योग सेतू आणि भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
Panjim Yog Setu
Panjim Yog SetuDainik Gomantak
Published on
Updated on

अनिल पाटील

कोकण ही परशुराम भूमी मानली जाते. भगवान परशुराम विषयक अनेक आख्यायिका आहेत. हाच धागा पकडून स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील मांडवीच्या तीरावर योग सेतू आणि भगवान परशुरामाचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

सरकारच्या साधन सुविधा विकास महामंडळाने कांपाल येथील भगवान महावीर बाल विहारच्या समांतर हा योग पथ विकसित केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त या तपोलोक योगक्षेत्राचे लोकार्पण करण्यात आले. या स्थळामुळे पणजीत आणखी एक पर्यटनस्थळाची भर पडली आहे.

योग पथाच्या प्रवेशापाशी सिंहद्वार आहे. तिथे बसवण्यात आलेले 'सिंहयाही' शैलीतील हे सिंह कोल्हापूर येथील जोतिबा परिसरातील मलिक नावाच्या कारागिरांने कृष्णशिलेतून कोरून काढले आहेत.

योगपथावर असलेल्या मांडवीवर उभारलेल्या योग सेतूवर योग पुरुष आणि पूर्ण योगीचे पुतळे बसवले गेले असून ते मोरजी येथील पोके यांनी बनवले आहेत.

Panjim Yog Setu
Ponda : आरोग्य तंदुरूस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे 'बासरी' वादन ; बांदोड्याच्या कलावंताची रसिकांना भुरळ

सेतूच्या पलीकडील योगपथावर योग दालन, योग मंडल साकारण्यात आले आहे. त्यानंतर समोर येणारा योगस्तंभ अनेक अर्थाने आगळावेगळा आहे. कृष्णशीला आणि ग्रॅनाईटमध्ये उभारलेला हा स्तंभ होन्नावर आणि चिकमंगळूर येथे बनवण्यात आला आहे.

या स्तंभावर योगाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. 'पृथ्वीवरील मानवी ऐक्य आणि सुसंवादासाठी योग' ही संकल्पना त्यात मांडण्यात आली आहे. हे योग मंडल असून यावर पृथ्वी, चंद्र ,सूर्य आणि तारे चित्रित केले गेले आहेत.

Panjim Yog Setu
Mopa-Dhargal Accident: धारगळ अपघाताप्रकरणी मिशन फॉर लोकलने केलीय 'ही' मागणी

या संपूर्ण योगपथावर योग आणि योगासनाची माहिती देण्यात आली आहे. योगपथावर योगासन करणारे मानवी पुतळे उभारण्यात आले असून तेही कृष्णशिलेतील आहेत. त्यापुढे प्राणायाम क्षेत्र, अष्टांग योग क्षेत्रही साकारण्यात आले आहे.

याच पथावर, मांडवी किनारी, गोमंतभूमीचा जनक मानल्या गेलेल्या परशुराम यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. एका हातात धनुष्यबाण आणि दुसऱ्या हातात परशू घेतलेला 30 फूट उंचीचा भगवान परशुरामाचा आकर्षण पुतळा कोलकात्यात बनवला गेला आहे.

परशुरामांना तपश्चर्या आणि योग साधनेचे अग्रमुनी मानले जाते. ग्लास रेनफोस्ट काँक्रीटपासून बनवण्यात आलेला परशुरामाचा हा भव्य पुतळा आतापर्यंतचा तो सर्वात मोठा पुतळा ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com