World Bee Day 2022: घट मधाचे मधु परी...

मधमाशांपासून मिळणारे मध हे माणसांचे आदिम खाद्य.
World Bee Day 2022:
World Bee Day 2022:Dainik Gomantak
Published on
Updated on

मानवजातीसाठी समाजप्रिय कीटक मित्र म्हणजे मधमाशी. मधमाशांपासून मिळणारे मध हे माणसांचे आदिम खाद्य. डोंगरकपारीत राहणाऱ्या गिरिजनांना त्याच्या विक्रीतून उत्पन्नही मिळते.

जगातले एकूण 33 टक्के अन्नउत्पादन मधमाशांवर अवलंबून आहे. जैवविविधतेचे रक्षण, निसर्गाचे संरक्षण-संतुलन तसेच प्रदूषण (Pollution) नियंत्रित करण्याचे कार्य मधमाशा करत असतात. सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील उत्क्रांतीतून सजीव सृष्टी निर्माण झाली. फुले, कीटक, गांधीलमाशी, मधमाशी यांची निर्मिती होण्याचा काळ एकच असावा असे मानले जाते.

पर्यावरण विनाश हा सध्याचा वर्तमान काळ आहे. त्यामुळे झपाट्याने होणाऱ्या हवामान बदलाचे अत्यंत गंभीर परिणाम जीवसृष्टीवर होताना दिसत आहेत. पर्यावरण ऱ्हासामुळे मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

World Bee Day 2022:
'कसे आहात' Google देणार कोकणीतुन उत्तर 'तूं कसो आसा'

मधमाशी हा आमच्या कृषी संस्कृतीतला एक महत्त्वाचा नैसर्गिक घटक. मधमाशांशिवाय शेती होऊ शकत नाही. तीळ, मोहरी, जवस, सूर्यफूल ह्या तेलबिया, कांदा, गाजर, मेथी, काकडी ही भाजीपाला पिके, आंबा, डाळिंब, नारळ, लिंबूवर्गीय फळपिके तर लसूण, मेथी या पिकांच्या परागसिंचनासाठी मधमाशा अनिवार्य आहेत. ही केवळ काही नावे झाली परंतु एकंदर अडीच लाख प्रकारच्या फुलझाडांच्या परागसिंचनासाठी मधमाशा आवश्यक आहेत. मधमाशा परागसिंचन करून आपल्याला अमाप अन्नधान्य मिळवून देतात. त्याकरिता त्या आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या ‘रिटर्न गिफ्ट’ मागत नाहीत.

मधमाशांमधील आपसातला सहकार हा थक्क करण्याजोगा असतो. एका पोळ्यात सुमारे 50 हजार मधमाशा असू शकतात. त्यात एक राणी माशी, 120 नर माशा, 15 ते 20 हजार कामकरी माशा असतात. राणीचे आयुष्य दोन ते तीन वर्षांचे असते. राणीमाशी पोळ्यात राहून अंडी घालत असते. नर जातीची मधमाशी आळशी असते. पोळे बांधणे, ते स्वच्छ ठेवणे, संरक्षण करणे अशी कामे कामकरी मधमाशा करतात. त्यांना कोणीही आज्ञा देत नाही. सर्व माशा नेमलेली कामे नित्यनियमाने आणि पद्धतशीरपणे करत असतात.

मधमाशांची गंध संवेदना ही अतिशय तीक्ष्ण असते. त्यांना पाच किलोमीटर परिसरातील गंध जोखता येतो. पुरेशी फुले असल्यास त्या गुंजन व नर्तन करून परिसरातील इतर मधमाशांना संदेश देतात व त्यानंतर सुरक्षिततेचा विचार करून पोळे बांधतात. मधमाशांचा सतत जीवन-मरणाचा संघर्ष चाललेला असतो. नवीन सुरक्षित जागेचा शोध घेऊन नवीन वसाहत निर्माण करण्याचे त्यांचे कार्य सतत चालू असते.

कीटकनाशकांच्या वापरातील वाढ, जंगल विनाश व वृक्षतोड यामुळे जगभरातील मधमाश्‍यांच्या वसाहती कमी होऊ लागल्या आहेत. 1974 च्या तुलनेत त्यांच्या संख्येत 30 टक्के घट झाली आहे. मधमाशांच्या दिवसेंदिवस घटत जाणाऱ्या संख्येमुळे जगाच्या समोर फार मोठी आव्हाने उभी राहिली आहेत.

पृथ्वीतलावरील अखेरची मधमाशी नाहीशी झाली तर त्यानंतर मानवजातीचं आयुष्य हे केवळ चार वर्ष एवढेच असेल असा धोक्याचा इशारा नोबेल पारितोषिक विजेते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी दिला आहे.

तिकडे युरोपियन देश, अमेरिका व चीनमध्ये मधमाशा वाचवण्यासाठी फुलझाडे लावली जात आहेत. मधमाशा पाळणाऱ्यांना सुविधा व प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भारतातही पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व राजस्थान या राज्यात मधुमक्षिका पालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. खादी ग्रामोद्योग आयोग व केंद्रीय मधमाशी संशोधन प्रशिक्षण संस्था अशा काही संस्थांमध्ये मधुमक्षिका व्यवसायाला आणि पालनाला प्रोत्साहन देतात.

मधाचे घट आपल्या विचारामुळे रिकामे पडू नयेत याची काळजी आपणच घ्यायला हवी. शेती आणि संस्कृती यांचा अविभाज्य घटक असलेले हे मधुघट राखून ठेवणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य असायला हवे.

स्लोव्हेनिया येथील जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ एंटोन जानसा (1734) यांनी सर्वप्रथम मधमाशांचे पर्यावरणीय महत्त्व जाणले. मधमाशांच्या जतनासाठी त्यांनी कृत्रिम पालन तंत्राचा शोध लावला त्यांचा 20 मे हा जन्मदिवस. जागतिक पातळीवर मधमाशी दिवस म्हणून 2018 पासून साजरा करण्यात येतो. मानवी कृतींपासून मधमाशांचे जतन व्हावे, समाजामध्ये मधमाशी जतन व रक्षण या विषयी जाणीव निर्माण व्हावी ही मधमाशी दिवस साजरा करण्यामागची मुख्य विचारधारा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com