ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये गोवा कुठे?

दरवर्षी 7 मे रोजी ‘जागतिक ॲथलेटिक्स दिन’ साजरा केला जातो
 World Athletics Day
World Athletics DayDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: तब्बल दोन दशकांपूर्वी, गोव्याच्या प्रतिमा गावकर हिने ब्रुनेईतील आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना 4 बाय 400 मीटर रिलेत रौप्यपदक जिंकले, त्यानंतर गोव्यातील ॲथलेटिक्सला धुमारे फुटणारे वातावरण तयार झाले. मात्र संशयास्पद पार्श्वभूमीवर प्रतिमाचा अकाली मृत्यू चटका लावणारा ठरला. त्यानंतर 2006 पासून तिनेक वर्षे ज्युनियर गोळाफेकीत गोव्याच्या स्टेफी कार्दोझ हिने झंझावात राखला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदके जिंकत तिने खूप आशा निर्माण केल्या, परंतु ज्युनियर (18 वर्षांखालील) वयोगटानंतर स्टेफी सीनियर पातळीवर अस्तंगत झाली. तिची गोळाफेक ऑलिंपिकपर्यंत पोचहू शकली नाही. स्टेफीनंतर राष्ट्रीय पातळीवर नाव कमावणारा गोमंतकीय ॲथलिट तयार झालाच नाही. राज्यात गुणवत्ता आहे, पण शालेय पातळीनंतर खेळाडू ट्रॅक अँड फिल्डवर दिसतच नाही.

 World Athletics Day
आज गोव्याचे पाणमांजर ‘वाइल्ड यू वेअर स्लीपिंग'मध्ये

स्टेफी आता गोवा क्रीडा प्राधिकरणात अधिकारी आहे. तिच्या पुढाकारामुळे हल्लीच प्राधिकरणाने गोवा ॲथलेटिक असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय मिनी ॲथलेटिक स्पर्धा घेतली. कोविडमुळे राज्यातील ॲथलिट दोन वर्षे स्पर्धात्मक ट्रॅकवर उतरले नव्हते. बांबोळीतील स्पर्धेत उदंड प्रतिसाद दिसला, मात्र या युवा ॲथलिट्सचा हा उत्साह यापुढेही कायम राहील का या प्रश्नाचे उत्तर किंबहुना नकारार्थीच असेल.

 World Athletics Day
8 मे रोजी सुरू होत आहे ‘आम्याचे फेस्त’

गोमंतकीय ॲथलिट राष्ट्रीय पातळीवर प्रकाशमान न होण्यामागे पुष्कळ कारणे आहेत. एक मात्र खरं, राज्यात ॲथलेटिक्ससाठी आवश्यक पोषक वातावरण आणि संस्कृती रुजलेली नाही. लुसोफोनिया क्रीडा स्पर्धा 2014 साली गोव्यात झाली. त्यानिमित्त बांबोळीत अद्ययावत ॲथलेटिक स्टेडियम तयार झाले. पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलातही ट्रॅक अँड फिल्डच्या सुविधा निर्माण झाले. साधनसुविधा आल्या, परंतु त्याचा लाभ घेत राष्ट्रीय पातळीवर गोमंतकीय ॲथलिट तयार झाले नाहीत हीच मोठी शोकांतिका आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) गोव्यातील ॲथलेटिक्समध्ये कार्य सुरू आहे. गोवा क्रीडा प्राधिकरण-क्रीडा खातेही ॲथलेटिक्ससाठी नियोजन करते, पण त्यांना मर्यादा आहेत. मरगळ दूर होण्यासाठी गोवा ॲथलेटिक असोसिएशनकडूनही भरीव आशा आहेत. ॲथलिट्सनी मैदानी खेळात कारकीर्द करावी यासाठी त्यांना आर्थिक प्रोत्साहनाची जास्त गरज आहे. पुरस्कर्त्यांची गरज आहेच आणि महत्त्वाचे म्हणजे राज्यातील ग्रामीण भागात पायपीट करून कच्ची नैसर्गिक गुणवत्ता हुडकणारे सेवाभावी मार्गदर्शक हवे आहेत.

- किशोर पेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com