इंद्रधनुष्याचा स्पर्श..!

ज्या इंद्रधनुष्या खालून बालपणी आपण बागडत बागडत गेलो त्या इंद्रधनुष्याला आता मागच्या दूर मागच्या क्षितिजावर पाहून ते हरखून जाणे असते.
Rainbow
RainbowDainik Gomantak
Published on
Updated on

लहानपणीचे दिवस आठवतात आणि ‘बालपण देगा देवा’ असे उद्गार सहजच तोंडातून बाहेर पडतात! बालपण आठवणे म्हणजे नेमके काय असते? ज्या इंद्रधनुष्या खालून बालपणी आपण बागडत बागडत गेलो त्या इंद्रधनुष्याला (Rainbow) आता मागच्या दूर मागच्या क्षितिजावर पाहून ते हरखून जाणे असते. ते हरखणे कधी थोडेसे हर्षभरित करते तर कधी थोडे उदासही करते आणि हा इंद्रधनुष्या खालून आता पुन्हा जाणे नाही याची वास्तववादी जाणीव अंतरात कायम असते पण पर्वरी येथील काही ज्येष्ठ मंडळींनी या इंद्रधनुष्याला स्पर्श करायचं प्रयत्न पुन्हा एकदा केला तो त्यांच्याच शब्दात…..

‘काही दिवसांपूर्वी आम्ही ज्येष्ठ मंडळी आमच्या ‘ज्येष्ठ नागरिक मंचा’त गप्पा मारत होतो. एका सदस्याने विधान केले की ते बालपणीचे आनंदाचे दिवस आता परत आयुष्यात येणे अशक्य. इतक्यात युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया युनिट, पर्वरीचे सभासद श्री प्रसाद तेलंग तेथे आले. आमचे बोलणे ऐकुन त्यांनी वाळपई येथील नानेली गावात ट्रेकिंग कम पिकनिक करण्याचा प्रस्ताव आमच्या पुढे मांडला. त्यांनी स्वतः आपला दुसरा सभासद श्री. राजीव नार्वेकर याच्याबरोबर नानेनीला जाऊन ट्रेकची पाहणी केली. तिथले फोटो आणि व्हिडिओ काढले आणि आम्हाला दाखवले. आमच्या सदस्यांचे सरासरी वय 75 होते.

Rainbow
अटल पुलाचे टोटल अपयश

त्यामुळे हा ट्रॅक आम्हाला जमेल की नाही याचा आढावाही घेतला. नानेलीला जाण्यासाठी लागणारी बस, नाश्ता, जेवण आणि इतर साहित्य युथ हॉस्टेल असोसिएशनच्या सदस्यांनी उपलब्ध करून दिले. खर्च प्रतिव्यक्ती केवळ सहाशे रुपये इतकाच होता. आमचा 32 जणांचा तांडा बसमध्ये आरूढ झाला. दहा वाजता आम्ही नानेलीला पोहोचलो. ठरल्याप्रमाणे येथे छान नाष्टा वगैरे करून पुढच्या पायी प्रवासाला सुरुवात केली. आमच्या पैकी काही सदस्य काठ्या घेऊन चालणारे होते. या सर्वांना युथ हॉस्टेलच्या चार सदस्यांनी अगदी सांभाळून जवळ जवळ तीस मिनिटांच्या प्रवासात कोणताही त्रास होऊ न देता सांभाळून नानेली येथील छोट्या आणि सुंदर धबधब्यावर नेले. तीस मिनिटांच्या त्या प्रवासानंतर धबधबा दिसताच सर्व मंडळी खुश झाली.’

‘तिथे वयाचा विसरच पडला. अगदी विचार न करता काहीनी पाण्यात उड्या मारल्या. बऱ्याच जणांनी पाण्यात जाण्यासाठी दुसरे कपडे आणले नव्हते. पण ते सुद्धा पाण्यात भिजण्याचा आनंद घेऊ लागले. आम्ही सर्व एकमेकावर पाणी उडवीत मजा केली मनात वाटले, ‘स्वर्ग कुठे, स्वर्ग कुठे?’.... ‘पृथ्वीवर! पृथ्वीवर!’

‘त्या स्वर्गीय ठिकाणाहून बाहेर पडण्याची कोणाचीच इच्छा होत नव्हती. पण वेळ झाली होती. सर्वजण नाईलाजाने बाहेर आले. तरी जवळजवळ दोन तास पाण्यात डुंबण्याचा आनंद आम्ही लुटला होता. नंतर त्याच मार्गाने आम्ही परत कार्यालयात पोचलो. येथेच जेवण केले मग हावजी, गाण्याच्या भेंड्या वगैरे कार्यक्रम झाला. सर्व मंडळी खुशीत होती.’

’पाच वाजता परतीचा बस प्रवास सुरू झाला. सात वाजता पुन्हा पर्वरीला पोहोचलो. हावजी जिंकणाऱ्या श्री शहा यांनी वाटेत स्वखर्चाने सर्वांना आईस्क्रीम (Ice cream) खिलवले. या वर्षाचा बालदिन, खुप वर्षानी बालकांप्रमाणे (Child) लहान होऊन आम्ही साजरा केला. दररोज आपल्यापासून दूर असणाऱ्या मुलांची तक्रार करणारी मंडळीही गप्प-गप्प झाली होती.’

हा एक साक्षात्कार होता.... ‘जीवन फार लहान आहे त्यात येणाऱ्या प्रत्येक आनंदाचा क्षण उपभोगून घ्या!’

- अनील राजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com