‘अ’ मराठी राज्य नाट्यस्पर्धेत आजचे नाटक-‘सौ.’

"सौ‌." हे इतिहासाचे नाट्य नाही तर, साक्षात राष्ट्रभक्तीच्या अंगारासोबत संसार करताना, अनुभवलेली, माईंच्या मनाची ती व्यथा आहे!
Marathi state drama competition
Marathi state drama competitionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: सावरकर!’’ हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्णलेप करून लिहावीत अशी ही पाच अक्षरे आहेत! प्रखर राष्ट्रभक्तीचा देदीप्यमान इतिहास त्यात दडलेला आहे.माणूस जन्मत:चं क्रांतिकारक असत नाही. देशभक्तीच्या विचारांनी आणि ध्येयाने प्रेरित होऊन तो क्रांतिकारक ‌बनतो. स्वतः:च्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून बलिदानासाठी बाहेर पडतो. आणि मागे राहिलेलं त्याचं कुटुंबही त्यांच्याइतक्याच हाल अपेष्टा, दारिद्र्य, दु:ख भोगत मातृभूमीचरणी समर्पित होतं.

Marathi state drama competition
कार्यकर्त्यांचे परिश्रम आपण वाया जाऊ देणार नाही; भाजपची आपल्‍यालाच उमेदवारी

ही सर्वच माणसे निश्चितच असामान्य असतात. परंतु आपल्या समाजाला त्यांचं असामान्यत्व कळत नाही, त्यांचे विचार स्वीकारण्याची वेळ आली की निर्लज्जपणे त्यांच्या विरोधात उभे रहातो. या सावरकर कुटुंबाला भारतीय समाजाकडून प्रेम तर नाहीच पण तिरस्कारही फारसा कधी मिळाला नाही कारण त्यांच्याकडे कायम दुर्लक्षच झालं. कटू सत्य सांगायचं झालं तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही या सावरकर कुटुंबाकडे जनतेचं दुर्लक्ष व्हावं म्हणून हेतूपुरस्सर केल्या गेलेल्या राजकीय प्रयत्नांना आपण बळी पडलो; आजही पडत आहोत.

Marathi state drama competition
'मगो उमेदवारांच्या पळवापळीचा आरोप बिनबुडाचा': भाजप प्रदेशाध्यक्ष

ज्या ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जन्मभर उभे होते. ते ब्रिटिश सरकार लंडनमध्ये सावरकरांचं वास्तव्य असलेल्या, इंडिया हाऊसवर नाव लिहिते, "भारतीय देशभक्त वि. दा.सावरकर"! आणि आपण भारतीय काय करतो? भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात खुद्द स्वातंत्र्यवीरांची ओळखसुद्धा विसरतो!?. क्षणभर त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना केली तरी त्या यातनांची तीव्रता कळावी असे या कुटुंबाचे खडतर आयुष्य! एकाच घरातील तीन बंधू आणि त्यांच्या पत्नी असे सहाही जण देशासाठी समर्पित झाल्याचे कदाचित जगातील हे एकमेव उदाहरण असावे. पुरुषांनी केलेला त्याग, पराक्रम याची नोंद इतिहासात थोडीबहुत तरी होते. परंतु स्त्रीचा त्याग, कष्ट, दु:ख चार भींतींच्या आड नेहमीच मूक होऊन रहातात. सौ. यमुनाबाई विनायकराव सावरकर अर्थात माई सावरकर ही इतिहासातील अशीच एक असामान्य व्यक्तिरेखा!

Marathi state drama competition
‘त्‍या’ सहा ग्रामपंचायतींची कचरा विल्हेवाट सुविधा तपासा; गोवा खंडपीठ

परंतु "सौ‌." हे इतिहासाचे नाट्य नाही तर, साक्षात राष्ट्रभक्तीच्या अंगारासोबत संसार करताना, अनुभवलेली, माईंच्या मनाची ती व्यथा आहे!

-दिग्दर्शकाचे मनोगत

लेखक: डॉ. स्मिता जांभळे/ आदित्य जांभळे

दिग्दर्शक: आदित्य जांभळे

संस्था: अथश्री, फोंडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com