कीर्तीकुमारची किमया

कलाकार किर्तीकुमार प्रभू, माशेल, आमचा मित्र! लहानपणापासून त्याला सायकलचं वेड. पॅशन सायकल चालवणं, सायकलचे बारीकसारीक एकेक भाग सोडवून परत जोडणं हा त्याचा खेळ
कीर्तीकुमारची किमया
कीर्तीकुमारची किमयाGomantak digital Team

मुकेश थळी 

मी ब्रिस्बेन,ऑस्ट्रेलीयात एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली. मधोमध बहुपदरी मोठ्ठे रस्ते. एका बाजूला दुपदरी सायकल ट्रॅक तर दुसऱ्या बाजूला जलमार्ग व त्यातून प्रवासी बोटींची रहदारी. सायकलींची मॉल्स व मोठमोठ्ठी प्रचंड दुकानं ओळीने. आपल्या भारतात असे दृश्य दिसणे कठीणच.

पण हल्लीहल्ली आमच्या देशातही सायकलींगचे, व्यायामाचे महत्व वाढायला लागलं आहे. गोव्यात मुलींना सायकल्स देण्यात आल्या आहेत. यातून आठवण झाली किर्तीची. कलाकार किर्तीकुमार प्रभू, माशेल, आमचा मित्र! लहानपणापासून त्याला सायकलचं वेड. पॅशन सायकल चालवणं, सायकलचे बारीकसारीक एकेक भाग सोडवून परत जोडणं हा त्याचा खेळ

कीर्तीकुमारची किमया
Blog: कामसू हात, स्वाभिमानी मान आणि प्रेमळ मन

किर्तीकुमार फाईन आर्टचा पदवीधर. एके काळी नाटकाचं नेपथ्य व प्रकाशयोजना या विभागातले ते एक भक्कम नाव होते. त्यानं एकदा कला अकादमीच्या कला प्रदर्शनात सायकलच्या भागांपासून तयार केलेली एक्रॉबॅट कलाकृती ठेवली होती.

सायकलचे आटे म्हणजे रीम विविध कोनातून वेल्ड करून त्याने ती कलाकृती साकारली होती. वर एखाद्या पक्ष्यासारखा सायकलचाच एक भाग दिसतो. “तुला ही कलाकृती इतकी का आवडली?” असं किर्तीनं त्यावेळी उत्सुकतेने विचारले.

कीर्तीकुमारची किमया
Blog: स्तुती, निंदा आणि त्यांचे प्रयोजन

मी उत्तर दिलं – 'साधेपणाचं सौंदर्य. सायकलचे साधे भाग. महत्वाचं म्हणजे रीम ज्या कोनातून बसवली आहेत ती पाहिल्यावर मला भूमितीच्या विविध आकृतींची आठवण झाली. कारण मी गणित विषयात स्पेशलायझेशन केलं आहे.” किर्ती हसला. त्याच्या घरात अशा अनेक कलाकृती आहेत ज्या घडवायला किमया व कौशल्य अंगात धगधगतं असावं लागतं. कलाकार तेव्हाच किर्तीवंत होतो!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com