नोकरीला रामराम ठोकुन महिलांनी उभारला व्यवसाय

युवतींसमोर नोकरी (Job) सोडून उद्योगाची कास धरणाऱ्या या तिघींचा हा उल्लेखनीय आदर्श या महिलांनी (Women) ठेवला आहे.
नाजुका मसुरकर,उमा रंकाळे,प्रगती मसुरकर
नाजुका मसुरकर,उमा रंकाळे,प्रगती मसुरकरDainik Gomantak
Published on
Updated on

पदव्युत्तर (एम. कॉम.) शिक्षण घेतलेल्या दोन विवाहित तरुणी, ज्यांनी सिम्बॉयसिस विद्यापीठातून एच. आर. विषयात पदवी मिळवली व एच. आर. म्हणून नोकरीतही रुजू झाल्या. असे असताना या दोघी निश्चय करून, चांगल्या नोकरीला (Job) पाच वर्षांच्या आत रामराम ठोकून, पार्टनरशिपमध्ये व्यवसायात उतरतात व स्वयंसिद्धा बनतात ही गोष्टच मुळी कौतुकास्पद आहे.

बेती, वेरें येथे राहणाऱ्या नाजुका मसूरकर व प्रगती मसुरकर या दोघी जाऊ-जाऊनी व उमा रंकाळे (त्यांच्या जवळच्या नातेवाईक) यांनी कॉलेजमधून शिक्षण घेतले. नाजुका आणि प्रगतीने एच.आर. म्हणून चांगल्या आस्थापनात नोकरीही मिळवली. मात्र या दोघींना स्वतः काहीतरी वेगळं करावं, स्वतःचा व्यवसाय करावा असे नेहमीच वाटायचे. त्याप्रमाणे निश्चय केला व ‘श्री कॅफे’ या नावाने 22 सप्टेंबर 2019 रोजी म्हापसा (Mapusa) येथे व्यवसायाची (Business) मुहूर्तमेढ रोवली. सोबतीला उमा रंकाळे ज्यांनी त्यांच्या बरोबरच एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले होते, त्यानाही घेतले. गेले तीन महिने या तिन्ही युवती पूर्णपणे स्वतः या कॅफेचा कारभार सांभाळतात. त्या स्वतः, खाद्यपदार्थ, जेवण सर्व्ह करण्यापासून, प्लेट उचलण्यातपर्यंत व गल्ला सांभाळण्यापर्यंत कामे करतात. विश्‍वासार्ह असे, फक्त गोमंतकीय पद्धतीचे खाद्यपदार्थ-जेवण उपलब्ध करून द्यायचे हे त्यांनी ठरवले आहे. आपल्या कॅफेमधली सारी हलकी कामे करण्यातही या उच्चशिक्षित व आधुनिक तरुणीना काही कमीपणा वाटत नाही.

नाजुका मसुरकर,उमा रंकाळे,प्रगती मसुरकर
गोव्यात सुरंगीच्या फुलांची आवकच मर्यादित

कपबशा, भांडी साफ करायला, फरशी पुसायला फक्त एक बाई व रांधायला आचारी आहे. स्वच्छतेबाबत इतर त्यांनी कॅफेत (Cafe) आदर्श निर्माण तयार केला आहे. गिऱ्हाईकांशी अदबीने वागणे, त्यांना उत्कृष्ट सेवा देणे यात कुठल्याही प्रकारची कसूर त्यांनी ठेवलेली नाही. मुख्य म्हणजे ‘श्री कॅफे’ सुरू करताना किती फायदा होईल याचा त्यानी विचार केला नव्हता तर जवळच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जे गरीब रुग्ण येतात, त्यांचे नातेवाईक येतात त्यांची सोय व्हावी, अल्पदरात त्यांना चहा-फराळ, जेवण मिळावे असाच विचार केला होता. हॉस्पिटलजवळ (Hospital) अशा मध्यम वर्गाला, गरीब वर्गाला परवडणाऱ्या कॅफेची गरजही होतीच. नाजुका आणि प्रगती म्हणतात, हॉस्पिटलमध्ये अनेक लोक येतात. अल्पदरात खाण्यापिण्याची सोय झाली तर ती त्याना हवीच असते याची कल्पना त्याना होती. गरज पाहून ऑर्डरनुसार हॉस्पिटलपर्यंतही त्या खाद्यपदार्थ (Food) , जेवण पुरवतात.

कष्टाने, सचोटीने व जीव ओतून आपला व्यवसाय या युवती करत आहेत. नोकरीसाठी आज अनेक युवती धडपडत आहेत. नोकरी (Job) नाही म्हणून निराशेच्या गर्तेत आहेत. अशा युवतींसमोर (Women) नोकरी सोडून उद्योगाची (Business) कास धरणाऱ्या या तिघींचा हा उल्लेखनीय आदर्श नक्कीच असेल.

- नितीन कोरगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com