राजकारणात कुटुंबराज परवडेल का?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी येत्या निवडणुकीत कुटुंबराज परवडणारे नाही असे जाहीर करून टाकले असते का? कुटुंबराजातून गोव्यात अस्थैर्य येते हे त्यांना समजून चुकले असावे. कुटुंबराज पद्धती गोव्यात सुरू झाली ती प्रदेश काँग्रेसमधून.
Party

Party

Dainik Gomantak 

Published on
Updated on

गोमंतकीय सामाजिक सलोख्याची परंपरा जपणारा वर्षअखेरीचा सण म्हणजे नाताळ. विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्यामुळे गोव्यातील राजकीय वातावरण हिवाळ्यात तप्त होऊ लागले आहे. निवडणूक जवळ आली की लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्त्यांचे एका राजकीय पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे, येणे नवीन नव्हे. गोव्याने असे प्रवासी पक्षीही बरेच पाहिले आहेत, परंतु यंदा राजकीय वातावरण अती ढवळून निघाल्यासारखे वाटते. काँग्रेसच्या आमदारांचे बळ दोनवर आले असून भाजपलाही राज्यात गळती लागली आहे. याचा फायदा आजवर राज्य विधानसभेत प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress), आम आदमी पार्टीला होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तृणमूलच्या अध्यक्ष मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) निमंत्रक मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे (arvind kejriwal) गोव्यात लागोपाठ येणे संभ्रमात टाकणारे वाटले तरी दोघांचे लक्ष्य लोकसभा निवडणूक 2024 आहे याबद्दल शंका नको.

गोव्यात वारंवार येऊन ममतादी, केजरीवाल त्याबद्दल आतापासून नियोजनही करीत असल्यास नवल नाही. त्याचा पत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागला असावा का? प्रदेश भाजपच्या पातळीवरील नकारात्मकतेची चाहूल त्यांना गेल्या रविवार 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्तिदिनी गोव्यात आल्यावेळी लागली असावी का? पंतप्रधान मोदीजी यांचा अस्वस्थ चेहरा, त्यांची देहबोली आणि त्यांनी मध्येच हळुवारपणे तोडलेले भाषणाचे बंध बरेच काही सांगून गेले आहे.

<div class="paragraphs"><p>Party</p></div>
गोव्याचे सागर सुरेश नाईक मुळे प्रधानमंत्र्यांच्या 'मन की बात'मध्ये झळकले

एकीकडे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देताना दुसरीकडे मोदीजींच्या चेहऱ्यावर वेदना का होत्या? ज्या गोव्याने त्यांचे पंतप्रधान होण्याचे फक्त स्वप्न फुलवले नाही तर त्याची पूर्तता होण्यासाठी धावपळ केली तो गोवा हरवतोय असा भास त्यांना झाला नसावा ना? काँग्रेसपेक्षा प्रदेश भाजपतील घुसमट मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर येऊ लागली आहे आणि त्याचा स्फोट निवडणुकीतील मतदानावेळी होऊ शकतो. काँग्रेस विधिमंडळ गटाला घरघर लागली तरी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यासारखे नेते जोपर्यंत काँग्रेसच्या पाठीशी आहेत तोपर्यंत काँग्रेसचे भविष्य अंधारलेले आहे, असे म्हणता येणार नाही. कार्यकर्त्यांच्या बळावर आजही काँग्रेस पक्ष राखेतून फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊ शकेल. तत्त्वनिष्ठ असे प्रदेश काँग्रेसाध्यक्ष गिरीश चो़डणकर सर्व शक्तिनिशी निवडणूक रणांगणात उतरल्यास काँग्रेसचा विजय कोणीही रोखू शकणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण काढताना आपले मित्र असा उल्लेख केला, पण त्यांच्याविषयी ते भरभरून का बोलले नाहीत? पणजीचे माजी आमदार पर्रीकर हे मोदीजींचे फक्त मित्र नव्हते तर भाजपचे तारणहार होते. प्रदेश भाजपचे नव्हे तर भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकीय प्रवाहाचे चाणक्य होते, देशाचे अर्थकारण गतिशील करण्याची क्षमता त्यांच्यात होती, चाणक्यनीतीतून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर भाजप देशाच्या सत्तेत पोचला हे मोदीजी मान्य करतील का? भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी या बुजुर्ग नेत्यांच्या सहवासात पर्रीकर यांची जडणघडण झाली होती, ती जपावी याकडे त्यांचा कल होता, परंतु आज त्या संस्कृतीकडे दुर्लक्ष झाल्यासारखे दिसते. गोव्यात आलेल्या मोदीजींना ते नक्कीच जाणवले असेल, अन्यथा त्यांच्यानंतर राज्य दौऱ्यावर आलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येत्या निवडणुकीत कुटुंबराज परवडणारे नाही असे जाहीर करून टाकले असते का? कुटुंबराजातून गोव्यात अस्थैर्य येते हे त्यांना समजून चुकले असावे. कुटुंबराज पद्धती गोव्यात सुरू झाली ती प्रदेश काँग्रेसमधून.

<div class="paragraphs"><p>Party</p></div>
नेहरूंची गोव्याविषयीची भूमिकाही अशीच बदलण्याच्या बेतात होती...

१९८९ पूर्वीही कुटुंबराज गोव्यात नव्हते असे नव्हे, परंतु त्यानंतर कुटुंबराजचा दबदबा वाढला आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हरवला. गोव्यातील कुटुंबराजला, अस्थैर्याला शह देण्यात यशस्वी ठरले होते ते पणजीचे माजी आमदारच. त्यांनी काँग्रेसमधील कुटुंबराजविरोधी जो आवाज उठवला त्यांत भाजपची सरशी झाली ती २०१२ साली. भाजपला प्रथमच २१ आमदारांनिशी राज्य विधानसभेवर भगवा फडकावता आला, त्यासाठी पाठिंबा मिळाला तो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातूनच. गेल्या दशकातील राजकारणाचा विचार केल्यास प्रदेश भाजपचा विस्तार झाला तरी मूळ भाजपचे कार्यकर्ते, भाजपची संस्कृतीही भाजपपासून दुरावते आहे. पर्रीकर मुख्यमंत्रीपदी होते तोपर्यंत त्यांनी भाजपची संस्कृती

सांभाळण्याचे प्रयत्न केले, संरक्षणमंत्रीपदी त्यांनी अल्पावधीत केलेले कामही उल्लेखनीय असेच आहे. पर्रीकर यांच्यामुळे भाजपविरोधी विचारांचे नेते माजी मंत्री माथानी साल्ढाणा प्रदेश भाजपत पोचले, काँग्रेस संस्कृतीही भाजपत पोचली. आज भाजप विचित्र वळणावर आहे. माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी भाजपवर ताशेरे ओढत आम आदमी पार्टीत प्रवेश केला, त्यानंतर कार्लोस आल्मेदा हेही काँग्रेसमध्ये पोचले, प्रदेश भाजपला आणखी ओहोटी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तर उतारवयातील त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री

प्रतापसिंह राणे यांच्याविरुद्ध सुरू केलेला संघर्ष नातेसंबंधांत दुरावा निर्माण करणारा आहे. सिनीयर राणे आज मुख्यमंत्रीपदी नसले तरी त्यांचे अस्तित्व गोव्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या प्रकल्पांच्या रूपाने आहे. ते इतरही मतदारसंघातून निवडून येऊ शकतात, परंतु त्यांनी आपल्या सत्तरी तालुक्यावर लक्ष केंद्रित केले, सत्तरीच नव्हे तर गोव्याच्या विकासाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली, पर्रीकर यांनी त्यावर कळस चढवला. सिनियर राणे यांना स्वारस्य असेल आणि त्यांची प्रकृती ठणठणीत असेल तर त्यांनी पर्ये मतदारसंघातून जरूर विधानसभा निवडणूक लढवावी. मागील काही वर्षे राजकीय निवृत्तीची भाषा अप्रत्यक्षरित्या करणारे सत्तरीचे खाशे काँग्रेसला लागलेल्या ओहोटीमुळे व्यथित झाले असावेत.

काँग्रेसला सावरण्यासाठीच त्यांनी पर्येतून निवडणूक लढवण्याची भाषा केली असावी. पर्येचे आमदार विधानसभेचे मार्गदर्शक म्हणून आजही चांगले काम करू शकतात, त्यांच्या अर्धांगिनी विजयादेवी राणे यांचा त्यांच्या यशात मोठा वाटा आहे. पिता-पुत्रातील संघर्ष मिटवण्यात त्या मोठी भूमिका बजावू शकतात. ज्युनियर राणे यांनी भाजपत विधानसभा पोटनिवडणुकीतून बस्तान बसवले आहे हे विसरता येणार नाही. आजवर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांच्यात व मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्यातील दूरी कायम आहे.

ज्युनियर राणे डाॅ. सावंत यांच्यापेक्षा हुशार आहेत, उच्च शिक्षण, अनुभवाच्या जोरावर त्यांना राजकारणात अत्युच्च शिखर गाठणे शक्य आहे. वडील व त्यांच्यातील संघर्षातून त्यांनाही काँग्रेसची वाट पुन्हा धरावी असे वाटत नाही ना? कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांचे काय? कुटुंबराजचे राजकारण सत्तरीत टिकले, भविष्यातही त्याला तडे जाण्याची शक्यता कमी आहे कारण त्यांनी मतदारांशी कायमस्वरूपी नाते जोडलेले आहे. कुटुंबराज संस्कृती भाजप स्वीकारणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळे आमदार बाबुश व महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांनाही त्यांची भूमिकाही स्पष्ट करावी लागेल. तडजोडीतून भाजपला पणजीचा बालेकिल्ला जिंकण्याची जबाबदारी उत्पल मनोहर पर्रीकर यांच्याकडे येऊ शकते. वास्तवात कुटुंबराज भाजपलाच नव्हे तर कोणत्याही राजकीय पक्षांना परवडणारे नाही, कुटुंबात त्यामुळे दुरावाच जास्त प्रमाणात येऊ शकतो.

सर्वसामान्यात तेढही निर्माण होऊ शकते. कुटुंबराजला दूर ठेवूनच गोव्याच्या विकासातले बदलाचे नवे टप्पे गाठणे शक्य आहे. देशपातळीवरही कुटुंबराजला यश मिळाल्याची उदाहरणे कमीच आहेच.

सुहासिनी प्रभुगावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com