मानसिक आरोग्य: लघुपट स्पर्धा

अशाच एका जागृतीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून डिचोलीच्या (Bicholim) रोटरी क्लबने ‘सर्चहोप डॉट कॉम’.च्या सहयोगाने मिळून एक लघुपट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
मानसिक आरोग्य: लघुपट स्पर्धा
मानसिक आरोग्य: लघुपट स्पर्धाDainik Gomantak
Published on
Updated on

मानसिक आरोग्याचे (Mental health) महत्व आज साऱ्यांनाच कळले आहे. अस्थिर परिस्थितीमुळे आज अनेकांची स्थिती सैरभैर झाली आहे. व्यक्तीचे मानसिक आरोग्य हेच समाजाच्याही स्थिरतेवर परिणाम करते या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक व्यक्ती, संस्था लोकांची मानसिक स्थिती समतोल कशी राहू शकेल या संदर्भात कसोशीने प्रयत्न करत आहेत. कलेच्या माध्यमातून देखील लोकांना जागरूक करायचे प्रयत्न चालू आहेत.

अशाच एका जागृतीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून डिचोलीच्या (Bicholim) रोटरी क्लबने ‘सर्चहोप डॉट कॉम’ च्या सहयोगाने मिळून एक लघुपट स्पर्धेचे आयोजन केले आहे. आज एकविसाव्या शतकातदेखील ‘मानसिक आरोग्य’ या विषयाच्या बाबतीत ज्या गैरसमजुती आणि भयगंड आहे तो दूर करण्याच्या प्रयत्नांचा ही स्पर्धा म्हणजे एक भाग आहे. स्पर्धेचा विषय आहे, ‘आजच्या युवकांना भेडसावणारी मानसिक आरोग्य समस्या’ कोकणी, हिंदी, मराठी, इंग्रजी तसेच कोणत्याही इतर स्थानिक भाषेतून स्पर्धेसाठी लघुपट बनवता येईल मात्र त्या इतर भाषिक सिनेमांना इंग्रजी सबटायटल्स असणे आवश्यक आहे.

मानसिक आरोग्य: लघुपट स्पर्धा
गोव्यातील मूर्तिशास्त्रातील नाग

लघुपटा बरोबर लघुपटासंबंधी माहिती देणारी एक व्हिडीओ क्लिप, जी एक मिनिटांपेक्षा अधिक कालावधीची असता कामा नये, करून पाठवावी लागेल. लघुपट करताना संबंधितांनी ही काळजी घेणे जरुरीचे आहे की लघुपटात हिंसक किंवा प्रक्षोभक दृश्ये असता कामा नयेत, तसेच धार्मिक किंवा राजकीय टीका टाळाव्यात. कोणत्याही प्रकारच्या जाहिराती अथवा ब्रँडचा अंतर्भाव लघुपटात असता कामा नये.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी २५ सप्टेंबर पर्यंत नोंदणी व ३० सप्टेंबरपर्यंत लघुपट बनवून सादर करावा लागेल. www search hope.com या साइटवर जाऊन नोंदणी करता येईल. या स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. स्पर्धेत विजेते ठरलेल्या लघुपटांना रोख पारितोषिके देण्यात येतील. त्या व्यतिरिक्त बक्षीस प्राप्त लघुपट टीव्ही चॅनलवरून दाखवण्यात येतील. स्पर्धेत असलेले सारे चित्रपट यूट्यूबवर टाकण्यात येतील. ज्या लघुपटाला नऊ ऑक्टोबरपर्यंत अधिकाधिक दर्शक लाभतील त्यांनाही रोख रकमेचे पारितोषिक देण्यात येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com