Goa Heritage: फेणीत उतरलेले मसालेदार सोने

फेणीत मिसळलेल्या विविध औषधी मसाल्यामुळे फेणीची चव देखील बरीच ‘मसालेदार’ बनलेली असते.
Goa Heritage
Goa HeritageDainik Gomantak
Published on
Updated on

ऑरो (AURO) या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे- सोने! या सोन्यासारखाच झळाळता रंग घेऊन, त्याच नावाची मसाला काजूफेणी ‘गोवा हेरिटेज डिस्टलरीने फेणीप्रेमींसाठी सादर केली आहे. मसाला फेणीची परंपरा गोव्यात शेकडो वर्षे आहे.

मात्र मसाला फेणी सामान्य फेणीप्रमाणे प्राशन केली जात नसते. औषध म्हणून किंवा विशेष प्रसंगी, कपाटात दीर्घकाळ बंद असलेली मसाला फेणीची बाटली बाहेर काढली जाते आणि अगदी तोलून मापून ग्लासात ओतली जाते.

त्यात मिसळलेल्या विविध औषधी मसाल्यामुळे या फेणीची चव देखील बरीच ‘मसालेदार’ बनलेली असते.

आपल्या ‘ऑरो’ या मसाला फेणीची निर्मिती करताना, गोवा हेरिटेज डिस्टिलरीने या वैशिष्ट्यपूर्ण मसाला काजूची परंपरा पूर्णपणे जपली आहे.

नैसर्गिकपणे सूर्यप्रकाशात पिकलेली काजूची फळे, तांब्याच्या भांड्यात केले जाणारे डिस्टिलेशन आणि शेकडो वर्षांपासून वापरण्यात येणारे स्थानिक औषधी मसाले यामुळे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त न्यूट्रल अल्कोहोल किंवा कृत्रिम न रंग न वापरता ऑरोचा सोनेरी रंग सिद्ध केला गेला आहे. यामुळे या पेयाला एक अस्सलता लाभली आहे.

Goa Heritage
फॅशन डिझाईन मधील गोमंतकीय नवप्रभा

मुळातच गोवा हेरिटेज डिस्टिलरीची पार्श्वभूमी तीन पिढ्यांची आहे. फेणी निर्मितीसाठी पूर्वपरंपरेने ते वापरत असलेले सेंद्रिय घटक आणि फेणीप्रती असलेली त्यांची प्रतिबद्धता त्यांच्या फेणीचा दर्जा नेहमीच अबाधित राखत आली आहे.

या डिस्टिलरीचे ‘मास्टर डिस्टिलर’ अजित मळकर्णेकर म्हणतात, ‘आमच्या कुटुंबाने पिढ्यानपिढ्या जोपासना केलेल्या जंगली काजू झाडांपासून कौशल्यपूर्वक निर्माण केलेले हे पेय एखाद्या कलानिर्मिती सारखे आहे.

त्याचा झणाणता स्वाद, मसाला काजू फेरीची चव चाखणाऱ्यांसाठी नक्कीच वेगळी अनुभूती देणारा असेल. हस्तकारागिरीचे वैशिष्ट्य असलेली ही निर्मिती गोव्याच्या स्थानिक परंपरेचे सार सांगणारी आहे. त्याची 100% नैसर्गिक प्रक्रिया खचितच अतुलनीय संवेदी अनुभव देणारी असेल.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com