वसाहतकालीन गोव्याचे अंतरंग

'इनसाईटस इन टू कॉलोनिअल गोवा’ या पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती 16 सप्टेंबर 2021 पासून ॲमेझॉनवर (Amazon) उपलब्ध करण्यात आली आहे.
वसाहतकालीन गोव्याचे अंतरंग
वसाहतकालीन गोव्याचे अंतरंगDainik Gomantak
Published on
Updated on

'इनसाईटस इन टू कॉलोनिअल गोवा’ (Insights into Two Colonial Goa) या पुस्तकाची पहिली आवृत्ती जी ॲमेझॉनवर (Amazon) डिसेंबर 2020 साली उपलब्ध करण्यात आली, तिला लाभलेल्या प्रतिसादामुळे याच पुस्तकाची दुसरी सुधारित आवृत्ती 16 सप्टेंबर 2021 पासून ॲमेझॉनवर (Amazon) उपलब्ध करण्यात आली आहे.

गोव्याचे (Goa) कुप्रसिध्द इन्किझीशन ‘भौगोलिक - राजकीय’ दृष्टीकोनातून फारसे पाहीले गेलेले नाही. किंबहूना इतिहासाची ही बाजू फारशी चर्चेतही आलेली नाही. या पुस्तकाचे लेखक द्वयी फिलोमेना लाॅरेन्स आणि गिल्बर्ट लॉरेन्स म्हणतात की त्यांना ‘इन्किझिशन आणि आशियातल्या पोर्तुगीज वसाहतवादाचे नेमके स्वरुप लोकांसमोर मांडायचे होते. लुसीटानियाच्या राजाने त्याच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी असलेल्या गोव्यावर इन्किझीशन ज्या कारणांसाठी थोपले त्या कारणांचा शोध घ्यायचा होता.

वसाहतकालीन गोव्याचे अंतरंग
धरण उशाला आणि कोरड घशाला

सन 1510 मध्ये कोकणच्या पश्‍चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांचा शिरकाव झाला (अर्थात गोवा हे नाव त्याकाळी प्रचलित नव्हते.) त्यानंतर 450 वर्षे त्यांनी या भूभागावर राज्य केले. त्याकाळात पोर्तुगीजांच्या अाधिन असलेल्या आफ्रिकन आणि आशियन भूभागांचे गोवा हे राजकीय, सैनिकी आणि धार्मिक केंद्र बनले. ज्यामुळे गोव्याला ‘पूर्वेकडचे रोम’ अशी संज्ञा मिळाली.

1510 ते गोवा मुक्त होईपर्यंत म्हणजे 1961 पर्यंत गोवा हे जागतिक वसाहतकरणाचे, भांडवलशाहीचे, दळण-वळणाचे, व्यापाराचे एकप्रकारे अग्रेसर प्रतिनिधित्व करत होते. ‘इनसाईटस इनटू कोलोनिअल गोवा’ हे पुस्तक या काळातल्या निर्णायक अपयशांची आणि यशांची चिकित्सा करते आणि त्या काळात घडलेल्या विशेष घटनांचे, ज्या घटनांनी गोव्याच्या इतिहासाला निर्णायक वळण दिले, मुल्यांकन करते. गोव्याचे जागतिक इतिहासाला आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक कश्‍याप्रकारचे योगदान आहे याचे विश्‍लेषण करण्याचा प्रयत्न आपल्या या पुस्तकातून आपण केलेला आहे असे या पुस्तकाच्या लेखकांचे म्हणणे आहे. आज जरी आपण 21 व्या शतकात पोहचलेलो असलो तरी इतिहासात शिकलेले काही धडे आजच्या काळात देखील लागू होण्यासारखे आहे असे त्यांना वाटते.

वसाहतकालीन गोव्याचे अंतरंग
गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन कोणासाठी?

पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत चार भागांच्या मालिकेतून पुस्तकातील विषयाचा विस्तार करण्यात आला आहे.

1. पार्श्वभूमी आणि द्रोही प्रवाह (1510 -1534 )

2. कोकण भूमीवरील इन्किझिशनपूर्व भौगोलिक - राजकीय डावपेच

3. कपटी विकास (1535 -1555)

4. इन्किझिशनपूर्व काळाच्या शेवटाचा आरंभ (1555 -1560 )

गोव्याने पाककृती, संगीत, धर्म यात पश्‍चिम आणि पूर्व जीवनशैलीचा मिलाफ एक प्रकारे स्विकारला आहे, जी गोव्याच्या पर्यटन आधारित अर्थव्यवस्थेत आपले योगदान देते आहे. परंतु त्या जीवनशैलीच्या दर्शनी भागाखाली अनेक वर्षांचा विस्मयकारक इतिहास आहे ज्यामध्ये संघर्ष, यश आणि अपयशांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या लेखक द्वयी फिलोमिना आणि गिल्बर्ट हे गोमंतकीय आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठामधून अनुक्रमे शिक्षण आणि वैद्यकशास्त्राची पदवी प्राप्त केली आहे. गिल्बर्ट यांना इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ रेडियोलॉजीची फेलोशिप लाभली आहे. सद्या हे जोडपे अमेरीकेत निवास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com