श्रीरामाचा प्रवास

रामाने दंडकारण्यात प्रवेश केल्यावर, तो अत्रि आणि त्याची पत्नी अनसूया राहत असलेल्या आश्रमात आला.
Shri Ram
Shri Ram Dainik Gomantak
Published on
Updated on

तेनसिंग रोद्गीगिश

आपण गेल्या रविवारच्या लेखात पाहिले की ब्राह्मणांचे उत्तरेकडून दक्षिणेकडे, दख्खनमध्ये स्थलांतर क्षत्रियांच्या प्रदेशात झाले असावे आणि रामायण हा त्याचा ऐतिहासिक दस्तऐवज असू शकतो. परंतु, ख्रिस्तपूर्व ६०२४ हा रामायणाचा कालावधी ही एक मोठी अडचण ठरली आहे.

(संदर्भ : वर्तक, २०१० : वास्तव रामायण, १९८). हा कालावधी ख्रिस्तपूर्व ६ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत असल्याचेही तज्ज्ञ म्हणतात. (संदर्भ : शर्मा, १९७१ : अ सोशिओ पॉलिटिकल स्टडी ऑफ रामायण, ५). साहजिकच, प्रत्यक्ष स्थलांतर कधी झाले, यावर या विभिन्न कालावधी असल्यामुळे बराच फरक पडतो.

वर्तक महाभारताआधी रामायण ठेवतात, तर शर्मा महाभारतानंतर रामायण घडल्याचे सूचित करतात. महाभारताचा कालखंड वर्तकांच्या मते ख्रिस्तपूर्व ५५६१, आचार यांच्या मते ख्रिस्तपूर्व ३०६७, आणि वाल्दिया यांच्या मते ख्रिस्तपूर्व १५००; इतका फरक खूप गोंधळात टाकणारा आहे.

ढोबळमानाने ब्राह्मणांचे स्थलांतर विंध्य ओलांडून दख्खनमध्ये पूर्वेकडे गंगा सिंधू मैदानात झाले; जे अत्यंत असंभाव्य वाटते. वालदिया यांच्या मते घनदाट जंगलातील गंगा मैदान होण्याचा कालावधी ख्रिस्तपूर्व ३,००० - २,५०० सांगतात. धुमेंच्या म्हणण्यानुसार, आर्यांनी सुमारे ख्रिस्तपूर्व २३००मध्ये नर्मदा ओलांडली. (संदर्भ : धुमे, २००९ : कल्चरल हिस्ट्री ऑफ गोवा, १२).

ख्रिस्तपूर्व ६०२४ हा कालावधी सरस्वती नदीच्या कोरड्या झालेया खालच्या खोऱ्यातून ब्राह्मणांचे स्थलांतर होण्याआधीचा आहे. अर्थात, दुसरी शक्यता असू शकते; महाभारताप्रमाणेच रामायणातही प्राचीन क्षत्रिय प्रदेशाचे असणे; अगदी सरस्वती खोऱ्यातून ब्राह्मणांचे निर्गमन होण्यापूर्वीही.

परंतु महाकाव्यातील अंतर्गत पुरावे, विशेषत: रामाने वनवासात व सीतेच्या शोधार्थ द्वीपकल्पात केलेली भटकंती, भेटलेल्या ऋषींच्या असंख्य आश्रमांचे वर्णन पाहता हे फारच दूरचे वाटते. एक गोष्ट जवळपास निश्चित आहे;

रामायण हे त्यांच्या जन्मभूमीतील रखरखीतपणामुळे विस्थापित झालेल्या ब्राह्मणादी लोकांच्या दख्खनमध्ये प्रवेश करण्याबद्दल, मुख्यतः ब्राह्मण तपस्वींच्या प्रवेशाबद्दल आहे. आणि त्या अर्थाने रामायणाची सुरुवातीची तारीख चुकीची वाटत नाही.

Shri Ram
धर्माची लक्षणे

एकूणच, महाभारताप्रमाणेच, रामायणातही वाडुकराशिवाय क्षत्रियांची वस्ती आहे. तपस्वी पुरुष आणि स्त्रिया वगळता इतर ब्राह्मण शांततेच्या शोधात जंगलात गेलेले अभावानेच आढळतात व जे गंगा-सिंधूच्या मैदानाच्या पलीकडे जाणाऱ्या कुरु-पांचल-ब्राह्मणांपेक्षा पूर्णपणे भिन्न दिसतात.

दख्खनमध्ये रामाला भेटलेले संन्यासी शतपथ ब्राह्मणात सांगितलेला त्यांचा त्यागाचा धर्म विसरले आहेत आणि त्यागाच्या विरोधात नवा पंथ स्वीकारला आहे असे दिसते. (संदर्भ : चक्रवर्ती, १९७४ : जैन लिटरेचर इन तमिळ, ४).

रामाला त्याच्या प्रवासादरम्यान भेटलेल्या ऋषिकुळाच्या तपशिलात जाणे उचित ठरेल. (संदर्भ : पार्गीटर, १९८४ : द जिओग्राफी ऑफ रामाज एक्झाइल, जेआरएएस, खंड २६.२). मी आर्यावर्तातील सर्व आश्रमांची नोंद घेणार नाही, फक्त त्याच्या सीमेवर आणि नर्मदा नदीच्या पलीकडे असलेल्यांची नोंद घेणार आहे.

रामाने दंडकारण्यात प्रवेश केल्यावर, तो अत्रि आणि त्याची पत्नी अनसूया राहत असलेल्या आश्रमात आला. हे नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे होते की उत्तरेकडे होते हे निश्चित नाही. कारण रामायणातील वर्णनावरून असे दिसते की दंडकारण्य नर्मदेच्या पलीकडे भोपाळपासून गोदावरी नदीपर्यंत पसरलेले होते;

Shri Ram
इथल्या पिंपळ पानावरती...

त्यामुळे ते बहुधा उत्तरेकडे होते. पण मी या यादीत अत्रि ऋषींच्या आश्रमाचा समावेश करत आहे कारण असे दिसते की व्यावहारिक हेतूने आर्यावर्ताच्या पलीकडील भूमीची सुरुवात येथे झाली. अत्री हे सप्तर्षींपैकी एक आहेत आणि ऋग्वेदात सर्वांत जास्त उल्लेख होतो, असे ऋषी आहेत.

त्यानंतर राम शारभंग ऋषींच्या आश्रमात पोहोचला, जो पारगीटरच्या मते विंध्यच्या उत्तरेकडील उतारावर असावा. या भागात अनेक संन्यासींचे निवासस्थानही होते. ही राक्षसांचीही भूमी आहे.

त्यानंतर राम कुठेतरी नर्मदा ओलांडतो आणि ऋषी सुतिकष्णाच्या आश्रमात येतो. शेवटी त्याने पुढची दहा वर्षे मुनी धर्मभृताच्या आश्रमात पाकाप्सरा सरोवराच्या काठावर घालवण्याचा निर्णय घेतला, ज्याचे स्थान पार्गीटर निश्चित करू शकले नाहीत.

दहा वर्षांनंतर राम, अगस्त्य आणि त्याचा भाऊ प्राणसम यांच्या आश्रमात गेला. पारगीटर हे नागपूरच्या आसपास कुठेतरी असल्याचे सांगतात. तिथून फार दूर नाही, पण मधुका जंगलाने विलग केलेले, पंकवती आणि गोदावरी नदीचे सुंदर फुलांचे जंगल होते. वर्णन नाशिकच्या परिसराचे असावे.

महाभारत (द्रोणपर्व, अभिमन्यूवध पर्व, ५९)नुसार, ऋषीमुनींच्या रक्षणासाठी रामाने सर्वात जास्त राक्षसांची येथेच हत्या केली - चौदा हजार. येथेच रावणाने सीतेला पळवून नेले होते. गोदावरी खोरे हे आर्य (त्यांच्या क्षत्रिय रक्षकांसह ब्राह्मण) आणि वाडुकर यांच्यातील चकमकीचे घटनास्थळ असल्याचे दिसते.

येथील ब्राह्मण-वाडुकर संघर्ष खूप जुना असावा कारण हा अगस्त्य मुनी, अग्रगण्य ब्राह्मण यांचा दक्षिणेकडे जाण्याचा प्रदेश होता. हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की अगस्त्यने स्थानिक राजकन्या लोपामुद्राशी लग्न केले.

Shri Ram
Portuguese : भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

त्यानंतर सीतेचा शोध रामाला आणखी दक्षिणेकडे घेऊन गेला. पम्पा सरोवराच्या काठावर, बहुधा सोलापूरच्या आसपास कुठेतरी, त्याला त्याची वाट पाहणारी शबरी झाडलोट करीत असलेला ऋषी मातंगांचा आश्रम सापडतो. शबरी ही ब्राह्मण नव्हती; ती स्थानिक वडुकर होती; शबर समाज संपूर्ण मध्य भारतात विखुरलेला आहे.

श्रमण म्हणजे जैन भिक्षू, स्पष्टपणे गैर-वैदिक. तेव्हा श्रमण शबरी कोण होती? ऋषी मातंगदेखील ब्राह्मण नव्हते; ते शूद्र होते. त्याचा वर्ण काढून टाकला, याचा सरळ अर्थ असा होतो की मातंग हे वडुकर होते; ज्यांना आर्य वर्चस्वात सामावून घेता येत नाही अशा सर्वांना सामावून घेण्यासाठी शूद्र ही एक सोय होती.

जैन लोक मातंगाला सातवे तीर्थंकर सुपार्श्वनाथाचे रक्षण करणारा यक्ष मानतात. मातंगाच्या वेळी आश्रमस्थान अनेक ऋषींनी व्यापले होते. मग ते जैनसंन्यासींचे निवासस्थान असू शकते का? अरण्यकांड, ७६.३०-३१मध्ये जुन्या काळात बांधलेल्या ब्रह्मदेवाच्या सुंदर उदात्त चैत्यची वर्णने आहेत

(संदर्भ : (संदर्भ : पार्गीटर, १९८४ : द जिओग्राफी ऑफ रामाज एक्झाइल, २५४). जसजसा आपण या लेखमालेतून शोध घेत जाऊ, तसतशी अनेक रहस्ये आपल्याला उलगडत जातील. रामायणातील आश्रमांची स्थाने पाहिली तर त्याच भौगोलिक प्रदेशालाच तर आपण आंतर-सह्याद्री कोकण म्हणतो ना?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com