Restaurant in Goa: फॉरेस्ट इन कॅफे

व्हेज-नॉनव्हेज सूपमुळे हा कॅफे तरुणाईची पहिली पसंती
Forest in Cafe
Forest in CafeDainik Gomantak
Published on
Updated on

पेशाने फॅशन डिझाईन असणाऱ्या वास्कोच्या (Vasco) स्नेहा भंडारे यांना कोरोनाच्या काळात लोकांना तयार अन्न देणाऱ्या सेवेचे कधी कॅफे (Forest in Cafe) मध्ये रूपांतर झाले हे कळालच नाही. आता तिथे मिळणाऱ्या विशिष्ट पदार्थांसाठी हे कॅफे सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे.

तिथले बावबन्स, वेगवेगळ्या प्रकारचे वुड फायर पिझ्झा, कालझोन्स, केक, कुकीज, मिळणारी कोल्ड कॉफी, मोचा कॉफी, आईस् टीज, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज- नॉनव्हेज सूप यामुळे कॅफे तरुणाईची पहिली पसंती बनली आहे. वास्कोच्या दाबोळी जवळच्या एमइएस कॉलेजजवळ हा कॅफे लज्जतदार , यम्मी पदार्थाने प्रसिद्ध बनले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा कॅफे ज्या पद्धतीने तयार झाला ती स्टोरी.

Forest in Cafe
Restaurants in Goa: मदर रेसिपीज

कोरोनाच्या पहिल्या लाटेत वास्कोत अनेक कंटेनमेंट होते त्यावेळी लोकांना अन्नपुरवठा कमी पडत होता. मग अन्नधान्याच्या ऐवजी तयार अन्नाची निकड वाटू लागल्याने इतरांच्या मदतीने स्नेहाने तयार अन्नाची पाकिटे पुरवठा सुरू केला. आणि त्यातूनच पुढे हे कॅफे तयार झाले. सुरुवातीला केक्स आणि कुकीज त्यातून आता चाय कॉफी ने आकार घेतला आहे. याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक झाडाझुडपांचा आधार घेत संपूर्ण निसर्गातच हा कॅफे बनवल्याने नागरिकांना तो आपला वाटतो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com