Reflexed ...आणि ‘रिफ्लेक्सड’ ब्रॅण्डचा जन्म झाला

‘रिफ्लेक्सड’ हे या ब्रॅण्डचे नाव जणू प्रदूषणकारी वातावरणाला त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचे स्वरुप प्रभावीपणे दर्शवत होते.
Reflexed
ReflexedDainik Gomantak
Published on
Updated on

हीना शाह

Reflexed : गेल्या काही वर्षांमध्ये गोवा हे महोत्सवांचे ठिकाण बनले आहे आणि त्याचबरोबर या महोत्सवांचा अपरिहार्य भाग बनून येणारे फ्लेक्स आणि पुनर्वापर न करता येणारे बॅनर यांचेही ते आगर बनले आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जागोजागी लटकणारे फ्लॅक्स कार्यक्रमानंतर निरुपयोगी बनूतात. त्यांचे विघटन होणे अशक्य असते त्यामुळे आपोआपच कधीतरी त्यांच्यावर माती ओढली जाते आणि हरितगृह वायूंच्या (ग्रीन हाऊस गॅस) उत्सर्जनाचे ते स्रोत बनतात.

Reflexed
Bicholim Theft Case: डिचोली बाजारात पाकिटमारांची टोळी

२०२१ मध्ये अपराजिता आणि ॲक्वीन गोव्यात आले तेव्हा त्यांच्या लक्षात ही समस्या आली आणि त्यांना अमुल्य अशी कल्पना सुचली. ही कल्पना ‘एक व्यवसाय’ या कक्षेबाहेरची होती. त्या कल्पनेचे खरे मुल्य फ्लेक्समधून तयार केलेल्या कलाकृतींसाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांच्या तासांचे आहे. त्यांचे ते परिश्रम ‘पर्यावरण संवर्धन’ या एकाच विषयावर केंद्रित झालेले होते आणि ‘एका वेळी एक फ्लेक्स’ हे त्यांचे धोरण होते. ‘रिफ्लेक्सड’ या त्यांच्या अभिनव ब्रॅण्डचा जन्म त्या दोघांच्या जाहिरात आणि फॅशन या पार्श्‍वभूमीशी सुसंगतच होता. असा एक ब्रॅण्ड जो ‘एकल वापर’ सामग्रीचे रुपांतर आकर्षक आणि दैनंदिन वापराच्या साधनांमध्ये करतो.

‘रिफ्लेक्सड’ हे या ब्रॅण्डचे नाव जणू प्रदूषणकारी वातावरणाला त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचे स्वरुप प्रभावीपणे दर्शवत होते. ‘रिफ्लेक्सड’ने सुरुवातीच्या काळात महोत्सवांच्या आयोजकांकडे सहयोग करून फ्लॅक्स गोळा केले. त्याशिवाय वैयक्तिकरित्या अनेक ठिकाणाहून त्यांनी फ्लॅक्स मिळवले. गोळा केलेले फ्लेक्स काळजीपूर्वक स्वच्छतेच्या तसेच निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेतून गेले. त्यानंतर त्या दोघांनी या फ्लेक्सना कलात्मक आणि वापरण्याजोगे रुप देण्यासाठी पुढील पावले उचलली. फ्लेक्सपासून आकर्षक वस्तू बनवणे हा त्यांचा नेहमीच मुख्य उद्देश राहिला.

फ्लेक्सला वेगळे उपयोगी रुप देणे हे काम नक्कीच महत्त्वाचे होते पण या नवीन कलात्मक वस्तू इतरत्र पाठवताना त्याचे पॅकेंजिग आणि वाहतूक व्यवस्थित होईल याकडेही ‘रिफ्लेक्सड’ चे बारकाईने लक्ष दिले आहे. पॅकेजिंगसाठी पेपर मेलरचाच वापर ते आवर्जुन करतात आणि वाहतूकीचा अवलंब जेव्हा आवश्‍यक असेल तेव्हाच होतो. कुटुंबातील सदस्य किंवा मित्र त्या वाटेने जाणार असतील तर त्यांच्यामार्फत वस्तू पाठवल्या जातात. पर्यावरणावरील भार कमी करण्याचा तो एक उपाय असतो.

‘रिफ्लेक्सड’ चे हे दोन्ही शिलेदार त्यांच्या दैनंदिन जीवनातही शाश्‍वत जीवनशैलीचे प्रखर समर्थक आहेत. प्लास्टिकचा वापर तर आपल्या जीवनात त्यांनी लक्षणीयरित्या कमी केलेला आहे. त्याशिवाय शाश्‍वत जीवनशैली प्रामाणिकपणे अंगीकारण्यासाठी ते इतरांनांही प्रवृत्त करत असतात. त्यांच्या मते, ‘ आपल्या देशात शाश्‍वतेला चालना मिळण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. सरकारी संस्था, उद्योग जगत आणि ग्राहक यांचा सहभाग त्यासाठी महत्त्वाचा आहे. या तिन्ही घटकांना, तसेच धोरण आखणाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या शैक्षणिक मोहिमा विविध शाश्‍वत प्रणालींना प्रोत्साहन देऊ शकतात. दुरुस्ती, पुनर्वापर, विचारपूर्वक खरेदी यासारख्या संकल्पना स्विकारून कचरा कमी करण्यात आपण हातभार लावू शकतो.’

Reflexed
Plastic Free Goa: मासे खरेदीसाठी दिली स्टील भांडी; चांदेल पंचायतीचा उपक्रम

नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून जाऊ नका

तुम्ही सोशल मीडियावर काहीही केले तरी त्यावर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया येत असतात. अनेकदा नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून जायला होते. काहीजण अशा प्रतिक्रिया बघून कन्टेन्ट बनवणेच सोडून देतात. असे न करता आपण सातत्याने काहीतरी करत राहणे गरजेचे आहे, असा सूर चर्चेत आला.

आधी पदवी घ्या....

महाविद्यालयीन जीवनात असताना अनेकजण आपल्या इंस्टाग्रामवर रिल्स बनवायला सुरू करतात. फॉलोवर्स थोडेसे वाढले की स्वतःला इन्फ्लुएसर्स समजू लागतात व त्यावरच अवलंबून राहतात. मात्र आपले शिक्षण पूर्ण करून इन्फ्लुएसर्सनी निर्वाहासाठी दुसरा पर्याय ठेवावा यावर सर्वांचे एकमत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com