आंबट, गोड रसाळ चवीचा 'अननस' करतो शरीरातील थकवा कमी

अननसाच्या झाडास केवड्याच्या झाडासारखी पाती येतात.
Pineapple
PineappleDainik Gomantak
Published on
Updated on

उन्हाळ्यात शरीरातील क्षाराचे प्रमाण झपाट्याने कमी होते आणि थकवा वाढतो अशा वेळेला मुबलक क्षार आणि भरपूर जीवनसत्वे असणाऱ्या रसाळ फळांची शरीरासाठी गरज असते. नैसर्गिक दृष्ट्या उन्हाळ्यात ती मुबलक प्रमाणात उपलब्धही असतात. यातीलच एक महत्त्वाचं फळ म्हणजे अननस.

अननसाच्या झाडास केवड्याच्या झाडासारखी पाती येतात. या पातीस काटे असतात. झाडाच्या मध्यभागी फळ येते. त्यास सर्वांगास काटे असतात. फळाचा शेंडा काढून जमिनीत लावला असता तो पुन्हा रूजतो. बाहेरून हिरवट मात्र आतून पांढरट पिवळसर फळ जीवनसत्त्वांच्या विविध प्रकाराने परिपूर्ण असते. याशिवाय फळात क्षारयुक्त पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.

Pineapple
वाघांचे अरण्यरुदन

मूळ दक्षिण अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशातील असणाऱ्या या अननसाला इंग्रजीत पायनपल म्हणतात.

शास्त्रीय नाव 'अनानास कोमोसस' असून ते ब्रोमेलीयासी या फॅमिलीतील आहे. आपल्याकडील वातावरणात त्याचे उत्पादन चांगले मिळते. आपल्या गोव्यात फोंडा,सांगे,सत्तरी भागातही अननसाचे चांगले उत्पादन घेतले जाते.

अननसाच्या सेवनाचे आरोग्यासाठी खूपच फायदे आहेत. यामध्ये कॅल्शियम ,पोटॅशियम, तांबे, लोह आणि इतर जीवनसत्त्वांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्‍ती वाढते. महिलांसाठी हे फळ अधिक उपयुक्त आहे. स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. मूत्रमार्ग स्वच्छ राहते. मासिक पाळीचा त्रास कमी होतो.

Pineapple
"पृथ्वीचे सौंदर्य तीला पुन्हा प्राप्त करून देऊया ही धरती हिरवीगार करूया..."

अननसामुळे अन्नाचे उत्तम पचन होते. जेवण पचत नसेल तर मिरी, पिंपळी व सुंठ या बरोबर अननस सैंधव टाकून खावा. यामुळे फार लवकर अन्नाचे पचन होते. अननस गर्भाशयास उत्तेजक असल्याने गरोदर स्रियांनी खाऊ नये.

अननसाचा मुरंबा ,जाम, स्वादिष्ट असतो.काही ठिकाणी नेहमीच्या जेवणात आणि औषधात फ्लेव्हर म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो. सद्याच्या कडक उन्हाळ्यात अननसाचे सेवन उपयुक्त आहे.त्यामुळे त्याची चव चाखलीच पाहिजे.

- अनिल पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com