भावनांनी परिपूर्ण असणारे जसे शब्दात मांडता येते तसेच ते चित्रातून किंवा छायाचित्रातूनदेखील मांडता येते. शब्द जसे ‘या हृदयीचे त्या हृदयी घालतात’ तसेच एखाद्या सुंदर चित्रामधले रंग-रेषा-आकारातूनही भावनांचे अवगाहन प्रभावीपणे करता येते.
मयंका हळर्णकर हिने टिपलेले हे छायाचित्र (Photo) , तो टाकत असलेले छायाचित्रातलेजाळे, रंगभोर आकाश. झाडांचे काठ घेऊन दिगंताला निघालेली नदी (River) या साऱ्यांचा व्युह मनावर गारुड करत राहतो.
मयंकाच्या दृष्टीने ‘’एक परिपूर्ण फ्रेम कॅमेऱ्यात (Camera) पकडण्यास सक्षम असणे हे (आयुष्यातील कोणत्याही गोष्टीबाबत), अचूक क्षणी नेमकी कृती करण्यासारखे आहे. फोटोग्राफीने माझी क्षितिजे विस्तृत केली आहेत, नवीन मित्र मिळविण्यात मला मदत केली आहे, नवे ज्ञान ढुंढाळण्यात मदत केली आहे आणि मला अनुभवसमृद्ध केले आहे. शोधणे, निरीक्षण करणे , समजणे, आकलन होणे, निवडणे...यातून जादुगार निसर्गाने (Nature) मला जीवनाचे अनेक अनुभव दिले आहेत. एखाद्या वेगळ्या कोनातून संपूर्ण जगाचे निरीक्षण करणारा फोटोग्राफीचा (Photography) आनंद हा शरीर-मनाच्या आणि विषयाच्या अनुनादात असतो. प्रतिमेद्वारे सर्वात सुंदर गोष्टी व्यक्त केल्या जातात, ज्यामुळे लोकांना आनंद आणि सांस्कृतिक संचयाच्या सौंदर्याचा अनुभव मिळतो.”
“छायाचित्रण ही एक कला आहे. इतिहास/घटना नोंद करणारी कला! वास्तव मांडू पाहणारी पण वास्तवाच्या पलीकडे जाण्यास मदत करणारी कला! फोटोग्राफीची मोहिनी जीवनात आहे परंतु ती जीवनापेक्षा उच्च आहे. छाननीला उभं राहण्याची क्षमता असलेले कोणतेही छायाचित्र हे जागतिक सौंदर्याचे प्रतीक आहे. फोटोग्राफी निर्मितीची प्रक्रिया ही वास्तव जीवनातील घटकांना पुन्हा समजून घेण्याची आणि त्याना परिपुष्ट करण्याची प्रक्रिया आहे.”
“हे माझ्यासोबत अनेकदा घडतं. माझे डोळे चमकतात. माझे मन भरकटते. मी गोष्टी अशार्हेने पाहण्यास सुरुवात करते, जसे मी त्यांना लेन्सद्वारे पाहते आहे. विशिष्ट दृश्यावर डोळे रोखून, धोरणीपणे, मंद गतीने, माझ्या दृष्टीने विविध कोनांचा अंदाज घेत, कौतुकपुर्ण नजरेने मी चालते. मी प्रेरित असते. मला आधीच माहित असते की हे एक चित्तथरारक चित्र बनेल. एक बिंदू असतो जिथे मी नेहमी माझ्या प्रेरणेच्या लक्षणांचा दुसरा अंदाज लावते.”
“मला उगाचच वाटते का, सर्वकाही सुंदर आहे? ही विशिष्ट फ्रेम खरोखर खास आहे का?" भयंकरपणे चकचकीत वाटण्याची जोखीम घेऊनदेखील, मी कबूल करेन की मला एखाद्या गोष्टीमध्ये आशावाद आणि सौंदर्य सापडत नाही असे फार क्वचित घडते. आनंद असो, वेदना असो, राग असो किंवा प्रेम असो; मला विश्वास असतो की हे सर्व सुंदर आहे. तो तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे आणि तोच तुम्हाला तुमचे वेगळेपण देतो.”
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.