Goa Election: पेडणेत बहुरंगी निवडणुकीची शक्यता

स्‍थानिक उमेदवारासाठी पेडणेवासीय आग्रही: समस्‍यांची जाण असणारा हवा उमेदवार पेडणेत बहुरंगी निवडणुकीची शक्‍यता
Goa Election:पेडणेत बहुरंगी निवडणुकीची शक्यता
Goa Election:पेडणेत बहुरंगी निवडणुकीची शक्यता Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे राखीव मतदारसंघात सध्या ‘भायलो-भितरलो’ असा वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगांवकर पुन्हा एकदा निवडून येतात की येथे परिवर्तन घडते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक ही बहुरंगी होणार असल्याचे जाणवते. भाजप, मगो, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, शिवसेना, आप, रिव्होल्युशनरी गोवा यांनी या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. बहुतांश पक्षांची उमेदवारीही निश्‍चित झाली आहे आणि ते कामालाही लागले आहेत. संपर्क मोहीम सर्वच इच्छुकांनी सुरू केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षातर्फे निवडणूक लढवून निवडून आलेले बाबू आजगांवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व त्यांना उपमुख्यमंत्री पदही मिळाले. आजगांवकर यांच्या भाजप प्रवेशानंतर आपणाला पक्षात किंमत राहिलेली नाही, अशी भाजपच्या ज्‍येष्ठ कार्यकर्त्यांची भावना झालेली असून त्यांच्यात नाराजी आहे. संधी मिळेल तिथे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण, या गटाने भाजपने या मतदारसंघातून स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी केली आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी भाजपच्या काही कार्यक्रमांमधून भाजपची उमेदवारी ही आजगांवकर यांनाच दिली जाईल, असे जाहीर केलेले आहे. भाजपच्या ज्‍येष्ठ कार्यकर्त्यांच्या गटाची ठरावीक अशी मते आहेत.

Dainik Gomantak

स्‍थानिक उमेदवाराचा आग्रह

बेरोजगारी, अनियमित पाणीपुरवठा, खंडित वीजपुरवठा या प्रमुख समस्‍यांनी पेडणे मतदारसंघाला ग्रासले आहे. मतदारसंघाची राखीवता शिथिल करावी, अशी मागणी जोर धरत आहे. स्‍थानिक उमेदवाराला उमेदवारी दिल्‍यास समस्‍यांबाबत सजगता असते. मात्र, प्रत्‍येकवेळी राखीवतेच्‍या नावाखाली उमेदवार लादला जातो. यावेळी तशी परिस्‍थिती येऊ नये, अशी मागणी पेडणे मतदारसंघातून केली जात आहे. त्‍याचा फटका कदाचित भाजपला बसू शकतो. मात्र, भाजप, काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड, आरजी व अपक्ष यांच्‍या उमेदवारांमुळे मतविभाजनाचा लाभ भाजप उमेदवाराला होऊ शकतो. स्‍थानिक उमेदवाराचा आग्रह जनतेने धरल्‍यास या मतांचे पारडे अन्‍यत्र झुकू शकते.

Goa Election:पेडणेत बहुरंगी निवडणुकीची शक्यता
Goa Election: नीलेश काब्राल परंपरा मोडणार काय?

उमेदवारांची तयारी सुरू

मगो पक्षातर्फे प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने त्यांनी मालपे येथे व त्यानंतर कोरगाव येथे कार्यालये सुरू करून वर्षभरापूर्वीपासून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केलेली आहे. अशाच प्रकारे ॲड. जितेंद्र गावकर यांनीही कार्य सुरू ठेवले असून त्यांना गोवा फॉरवर्डतर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेतर्फे सुभाष केरकर यांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरवात केली आहे. प्रवीण आर्लेकर, ॲड. जितेंद्र गावकर यांनी मोपा विमानतळ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने, स्थानिक ट्रक मालकांच्या बाजूने आंदोलनात भाग घेतला आहे. शिवसेनेतर्फे विमानतळ बांधकामाची माती शेतीत घुसलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविण्यात आला आहे.

Dainik Gomantak

जनमत कुणाच्‍या बाजूने?

पेडणे मतदारसंघात मोपा विमानतळ प्रकल्‍प, क्रीडानगरी, आयुष इस्‍पितळ, आयटी पार्क, धारगळ जलशुद्धिकरण प्रकल्‍प यासह अन्‍य प्रकल्‍पांचे काम सुरू आहे. मोपा विमानतळ पुढील वर्षीपर्यंत पूर्णत्त्‍वास येईल. तर क्रीडानगरी, आयुष इस्‍पिळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जलशुद्धिकरण प्रकल्‍प उद्‍घाटनाच्‍या प्रतीक्षेत आहे. त्‍याचा लाभ सत्ताधारी भाजपला कितपत होईल. विरोधकांनीही ‘आयात’ उमेदवार नकोच, अशी ठाम घेतल्‍याने जनमत कुणाच्‍या बाजूने झुकणार, हेही आगामी काळात समजेल.

काँग्रेसमध्‍ये संभ्रम

काँग्रेसतर्फे विठू मोरजकर व तेलंग पंचवाडकर यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत, तर काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी रामा पेडणेकर या स्थानिक युवकाचे नाव पुढे केले आहे. पेडणे मतदारसंघातून येत्या निवडणुकीसाठी विविध पक्षातून निवडणूक लढविण्यासाठी बरेच उमेदवार इच्छुक असले तरी काही पक्षात युती झाली तर उमेदवारांची ही संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

Goa Election:पेडणेत बहुरंगी निवडणुकीची शक्यता
Goa Election: ‘भंडारी विरुद्ध भंडारी’ लढत शक्य

कोरगावकरही इच्छूक

‘मिशन फॉर लोकल’ या संस्थेच्या माध्यमातून कोरगावमधील राजन कोरगावकर यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. कोविड काळात त्यांनी मदत कार्य केले होते. ट्रक मालकांच्या आंदोलनात भाग घेतला. मात्र अजूनपर्यंत कुठल्या पक्षातर्फे आपण निवडणूक लढविणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. पण आता स्थानिकच आमदार हवा, या मागणीवर ते जोर देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com