पद्मपुरस्कार प्रेरणादायी ठरोत!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांची घोषणा होत असते आणि अख्ख्या देशाचे लक्ष तिच्याकडे लागलेले असते.
Padma Shri Awards 2022
Padma Shri Awards 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांची घोषणा होत असते आणि अख्ख्या देशाचे लक्ष तिच्याकडे लागलेले असते. यंदाच्या पद्मपुरस्कार विजेत्यांत दोन गोमंतकीयांची नावे आहेत. पद्मनाभ संप्रदायाचे सध्याचे अध्वर्यू ब्रह्मेशानंद स्वामीजी आणि फुटबॉल नामक देखण्या खेळात गोव्याची कीर्ती सर्वदूर पोहोचवणारे ब्रह्मानंद शंखवाळकर पद्मश्री Padama Shri झपुरस्काराने सन्मानित होणार आहेत. आपापल्या क्षेत्रातली दोघांचीही कामगिरी प्रशंसनीय असून योग्य वेळी योग्य व्यक्तीना देशातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार दिला जातोय याचा आनंद समस्त गोमंतकीयाना वाटायला हवा. (Padma Shri Award inspiring)

Padma Shri Awards 2022
पर्येत राण्यांचे बंड की गृहकलह?

ब्रह्मेशानंद स्वामीजींनी पद्मनाभ संप्रदायाचे कार्य आपल्या पूर्वसुरींच्याच निष्ठेने पुढे नेले आहे. संप्रदायाच्या सामूहिक जाणिवा केवळ धर्माच्या चौकटींतच बंदिस्त राहू नयेत तर या जाणिवांना जबाबदार व समाजाभिमुख वर्तनाची प्रेरणा मिळावी, या हेतूने आज ब्रह्मेशानंद कार्यरत आहेत. व्यसनमुक्तीपासून संस्कृतच्या प्रसारापर्यंत आणि कुशल याज्ञिक घडवण्यापासून विश्वशांतीसाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांतील योगदानापर्यंत त्यांचे आणि त्यांच्या संप्रदायाचे कार्य विस्तारले आहे. त्यांचे गुरू ब्रह्मानंदस्वामींनी नेहमीच्या चाकोरीच्या बाहेर जात संप्रदायाच्या कार्याला समाजसेवेचे परिमाण देण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न केले आणि तोच वारसा ब्रह्मेशानंद समर्थपणे पुढे नेत आहेत. गोमंतकीय समाजव्यवस्थेत संख्येने मोठा असलेल्या कष्टकरी समाजाला अध्यात्मिक उन्नतीबरोबर भौतिक प्रगतीसाठी लागणारे आत्मभान देण्याचा जो यत्न गेल्या दोन- तीन दशकांत गतिमान झाला आहे, त्याच्या अनुषंगाने पाहिल्यास पद्मनाभ संप्रदायाच्या कार्याची महती पटेल. हा पुरस्कार खरे तर समस्त पद्मनाभ संप्रदायाच्या सत्कार्याला मिळालेला पुरस्कार असून खुद्द ब्रह्मेशानंदही तोच अभिप्राय देतील, यात शंका नाही. अर्थात या पुरस्काराने संप्रदायाची जबाबदारीही वाढलेली आहे.

Padma Shri Awards 2022
आचारसंहिता आणि वारंवार होणारे उल्लंघन

व्यसनमुक्तीच्या चळवळीला मिळत असलेले यश कधीही झाकोळले जाऊ शकेल अशा प्रकारची प्रलोभने पर्यटन आणि अन्य उपक्रमांच्या आडोशाने तरुणाईसमोर ठेवली जात आहेत. जुन्या कुटुंबव्यवस्थेला लागलेली घरघर संस्कारांच्या तुटवड्यांत परावर्तीत होताना दिसते आहे. अमली पदार्थांचे जुनेच आव्हान नव्या आवेशात समोर येत आहे आणि विद्यमान राजकीय व्यवस्था याला आवर घालण्याच्या मानसिकतेत असल्याचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. अशा अवस्थेत अनुयायांचे मनोधैर्य वाढवण्याबरोबरच जाती- धर्माच्या चौकटी ओलांडून समाजसेवेचा विस्तार करणे आवश्यक झालेले आहे. संप्रदाय आणि ब्रह्मेशानंदांचे विचारचक्र याच दिशेने वेग घेईल याची खात्री आम्हाला आहे.

ब्रह्मानंद शंखवाळकर हे नाव भारतीय फुटबॉलमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. एके काळी गोव्याने Goa देशी फुटबॉलवर राज्य केले. त्या कालावधीत देशांत जे अव्वल खेळाडू समोर आले, त्यात ब्रह्मानंद वरच्या स्थानावर होते. गोलरक्षण करताना प्रतिस्पर्धी संघासमोर त्यांच्या रूपाने एक अभेद्य भिंतच उभी असायची. स्थानिक, आंतरराज्य आणि आंतर-क्लब अशा विविध स्तरावर ब्रह्मानंद यानी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत अनेक होतकरू तरुणांसमोर आदर्श निर्माण केला होता. खेळाला असलेले ग्लॅमर ज्या काळांत टीव्हीच्या माध्यमातून घरोघर पोहोचले नव्हते आणि देशातील आर्थिक गुंतवणुकीला क्रिकेटशिवाय अन्य काही सुचत नव्हते अशा काळात ब्रह्मानंद देशभरातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातले ताईत बनले होते. अगदी बंगालमधील निस्सिम फुटबॉल चाहतेही गोवा आणि ब्रह्मानंद असेच समीकरण एकेकाळी लावताना दिसायचे. पण, ब्रह्मानंद याना पद्मश्री मिळणे हा गोव्याच्या फुटबॉलचा FootBall गौरव, असे म्हणावे का? असा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे ह्या खेळाचा गळा आवळण्याचे यत्न गेल्या काही वर्षांत चालल्याचा संशय बळावतो आहे. फुटबॉलवर पोर्तुगीज वसाहतवादाची छाप असल्याच्या खुळचट प्रतिपादनातून ही गळचेपी चालली आहे आणि ती करणारे इंग्रजांकडून मिळालेल्या क्रिकेटच्या व्यावसायिक लाभांना मात्र कवटाळताना दिसतात. पणजीतील फुटबॉल स्टेडियम पाडून टाकण्यापासून सुरू झालेले हे षडयंत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. फुटबॉल अकादमीसारख्या थिट्या यत्नांची मजलही उत्तम खेळाडूच्या निर्माणापर्यंत गेलेली नाही. फुटबॉलच्या या नियोजित उपेक्षेमुळे तरुण व किशोरांमधले फुटबॉलविषयीचे प्रेम उणे झालेले नाही मात्र ते प्रत्यक्ष सहभागावरून निष्क्रिय अवलोकनाच्या पातळीवर पोहोचले आहे. आज गोव्यातला युवावर्ग युरोपियन लीग नुसत्याच पाहातो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी व पोर्तुगालच्या ख्रिस्तियाने रोनाल्डोत आपला आदर्श शोधायचा यत्न करतो तर दुसरीकडे पंजाब, बंगाल, केरळसारख्या बड्या राज्याना लीलया हरवणारा गोवा नगण्य राज्यांकडून पराभूत होतो. क्लब स्तरावरील फुटबॉलचीही गोव्यात दुर्दशाच झालेली आहे. ब्रह्मानंद शंखवाळकरांच्या पुरस्काराने आपली चूक राज्यकर्त्यांच्या लक्षात आली आणि गोमंतकीय फुटबॉलला पुन्हा सोनेरी दिवस दाखवण्याची शपथ घेतली गेली तरच त्या पुरस्काराचे चीज होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com