चित्रकलेचे धडे गिरवणाऱ्यानां 'पेन्ट ॲन्ड सीप' उपक्रमामध्ये संधी

पंचतारांकित हॉटेल ते साधी रेस्टांरंटस, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपला हा उपक्रम आयोजित करून मरियमने गेल्या एक वर्षात अशा प्रकारच्या सुमारे 12 संध्याकाळची निर्मिती केली आहे.
Miriam Gracious
Miriam GraciousDainik Gomantak

मिरियम ग्राशियस

मिरियम ग्राशियस जाहिरात क्षेत्रात काम करणारी चित्रकार आहे. चित्रकारिता आणि जाहिरात या दोन्ही क्षेत्राचा तिचा अनुभव खुप वर्षांचा आहे. गेल्या वर्षांपासून तिने एक अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. उपक्रमाचे स्वरुप साधे असले तरी चित्रकलेबद्दल ज्यांना उत्सुकता आहे पण चित्रे रंगवणे हा ज्यांचा व्यवसाय नाही त्यांच्यासाठी तो फार मजेशीर आहे. या उपक्रमाला मिरियमने ‘पेन्ट ॲन्ड सीप’ असे नाव दिले आहे.

संध्याकाळी रेस्टॉरंटमध्ये पेयाचा आस्वाद घेता घेता तिथे आलेल्या गेस्टना, त्यांची सृजनशीलता चित्रांमधून साकार करण्याची संधी हा उपक्रम देतो. रेस्टॉरंटमधले वेधक वातावरण, टेबलवर मांडलेले पेय, समोर कॅनव्हास, हातात रंगाने माखलेला ब्रश आणि रंग-रेखनाचे धडे देत असलेली मारिअम असा हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रकारितेचा वर्ग असतो. या वर्गात चित्रकलेचे धडे गिरवणारे विविध व्यवसायाशी संबंधित असतात.

Miriam Gracious
Blog: विद्याधर हा शुद्ध क्षत्रिय असावा का?

आर्किटेक्‍ट, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, विद्यार्थी, गृहीणी, निवृत्त नोकरदार असे वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक कॅनव्हासवर चित्र रेखाटण्याची आपली सुप्त इच्छा या उपक्रमाद्वारे आनंदाने भागवून घेतात. आपल्या या उपक्रमाबद्दल मरियम म्हणते, ‘कला सर्वांसाठी उपलब्ध असली पाहिजे असे मला वाटते म्हणून मी त्यांच्यासाठी अशाप्रकारची अविस्मरणीय संध्याकाळ, ज्यात चित्रकलेचा आनंद आणि चैतन्यमय सामाजिक वातावरण या दोन्हीची सांगड आहे, निर्माण करण्याचा प्रयत्न करते.

पंचतारांकित हॉटेल ते साधी रेस्टांरंटस, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपला हा उपक्रम आयोजित करून मरियमने गेल्या एक वर्षात अशा प्रकारच्या सुमारे 12 संध्याकाळची निर्मिती केली आहे. महिन्यात सरासरी एकदा तरी हा उपक्रम ती घडवून आणते. अर्थात विशिष्ट किमान शुल्क मिरियम त्यासाठी आकारते. त्यातून या उपक्रमात सहभागी झालेल्यांना कॅनव्हास, रंग, ब्रश ही आवश्‍यक साधने मिरियम पुरवते.

चित्राचा विषय ठरल्यानंतर, ते चित्र कॅनव्हासवर स्वत: उतरवताना मिरिअम उपस्थितांना चित्राचे रेखाटन, त्यात रंग कसा भरावा, रंगाचे मिश्रण कसे करावे, कॅनव्हसवर रंग कसे उतरवावेत याचे धडे देत राहते. उपक्रमात सहभागी झालेले लोक त्यानुसार चित्र रंगवतात. निर्मितीचा आनंद त्यातून त्यांना मिळत राहतो. आपण तयार केलेली ती चित्रे मग ते कौतुकाने घरी घेऊन जातात.

Miriam Gracious
Blog: वर्ण संकल्पनेचा विचार

‘ह्या उपक्रमाची संकल्पना आपल्याकडे जरी नवी असली तर परदेशात अशाप्रकारचे उपक्रम चालतात. मी तिथूनच ही संकल्पना उधार घेतली आहे.’ असे मिरियम आपल्या या उपक्रमाविषयी बोलताना सांगते. या उपक्रमाला आतापर्यंत तिला मिळालेला प्रतिसाद मिश्र स्वरुपाचा आहे. कधी कमाल ३५ लोकांनी या उपक्रमात उपस्थिती लावली आहे तर कधी फक्त ४ जणांची उपस्‍थिती देखील मिरियमला मिळाली आहे.

आपल्या अनुभवातून मिरियम सांगते की तिच्या या उपक्रमाला दक्षिण गोव्यापेक्षा उत्तर गोव्यात तिला अधिक प्रतिसाद लाभतो. उत्तर गोव्यात पर्यटकांची अधिक वर्दळ असल्यामुळे कदाचित तसे असेल असा होरा ती व्यक्त करते. पर्यटकांबरोबरच स्थानिक होतकरू देखील तिच्या या उपक्रमात चित्रे रंगवण्याची संधी घेतात.

मिरियमच्या ‘सीप ॲन्ड डाईन’ मध्ये भविष्यात आपल्याला सहभागी व्हायचे असेल तर तिच्या @MiriamGraciasArt या इन्‍स्टाग्राम खात्यावर जरूर लक्ष ठेवा. पेयाचा सीप घेता घेता कॅनव्हासवर उतरणाऱ्या रंगातून तुमचा एखादा मास्टरपिस आकाराला येणे कठीण नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com