जुनेपुराणे स्वप्न-महाल

मल्टिप्लेक्स आल्यानंतर सारी सिनेमा संस्कृतीच बदलून गेली आहे. सिनेमाला जाणे हा देखील एकेकाळी कौटुंबिक सोहळा असायचा.
जुनेपुराणे स्वप्न-महाल 'सिनेमा थिएटर'
जुनेपुराणे स्वप्न-महाल 'सिनेमा थिएटर'Dainik Gomantak
Published on
Updated on

मल्टिप्लेक्स (multiplexes) आल्यानंतर सारी सिनेमा संस्कृतीच बदलून गेली आहे. सिनेमाला जाणे हा देखील एकेकाळी कौटुंबिक सोहळा असायचा. ॲडव्हान्स बुकिंग (Advance booking) म्हणजे, सिनेमा थिएटरचा मॅनेजर किंवा तिकीट काउंटरवरील एखाद्याकडे असलेल्या वाशिल्याची परिणती असायची. ‘म्हाका थेटर मॅनेजर वोळखता’, हे वाक्य ऐटीत मित्रा-शेजाऱ्यांना सांगताना जणू आपली ओळख राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे (किंबहुना त्या काळात मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या ओळखणे ही फार महत्त्वाची बाब असायची असेही नाही) असाच असायचा. तिकीट काउंटरवरील झुंबड, ज्याची कुवत असेल त्याचे त्या झुंबडीत शिरून तिकीट (ticket counter) काढण्याचे कौशल्य, तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचे गिऱ्हाईक हेरणारे कसबी चेहरे, ‘दो का पाच’चा गणिताबाहेरचा हिशेब वगैरे सारी या पासष्टाव्या कलेची बाह्यरूपे होती.

जुनेपुराणे स्वप्न-महाल 'सिनेमा थिएटर'
जुनेपुराणे स्वप्न-महाल 'सिनेमा थिएटर'Dainik Gomantak
जुनेपुराणे स्वप्न-महाल 'सिनेमा थिएटर'
गोव्यातील स्थलांतरितांच्या तीन पिढ्यांचा इतिहास: 'स्वप्न सारस्वत'

‘सिने आगासाईं’ आगशी, ‘सिने गुलमर्ग’ रायबंदर, ‘सिने पॅरडाईज, कुंकळ्ळी, ‘सिने राधाकृष्ण’ साखळी, ‘राजहंस’ अस्नोडा वगैरे सिनेमा थिएटरे गोव्याच्या ग्रामीण भागात होती. या थिएटरची नावे जर तुम्ही साठ-सत्तरीच्या दशकात जन्माला आलेला असलात तरच तुम्हाला आठवतील. अजूनही यापैकी काही थिएटरांचे भग्नावशेष रस्त्यावरून जाताना दिसतात. ‘सिने प्रशांत’ सावर्डे- कुडचडे, ‘एल कापितान’, ‘सिने लता’ मडगाव, ‘एल माँत’, ‘सिने वास्को’ वास्को, ‘हिरा टॉकीज’ डिचोली ही शहरातली गर्दी असणारी थिएटरे होती. मुंबई-पुण्यात प्रदर्शित होऊन साधारण सहा-आठ महिन्यांनंतर सिनेमा या थिएटरमध्ये दाखल व्हायचे. गोव्याचे वितरक झांट्ये किंवा राव यांची पुणे बेळगावच्या वितरकांबरोबर जशी वट असेल त्याप्रमाणे सिनेमाच्या आगमनाचे वेध सुरू व्हायचे. ‘अजून प्रिंट पावंक ना’, या सबबीवर अनेकदा या थिएटरमधले पहिले शो कॅन्सल व्हायचे. त्याकाळची अजून चालू असलेली सिनेमा थिएटरे म्हणजे वास्कोचे ‘एल माँत’, डिचोलीचे ‘हिरा टॉकीज’, म्हापशाचे ‘अलंकार’, पेडणेचे ‘नंदी’, पणजीचे ‘सम्राट-अशोक’, मडगावचे ‘सिने विशांत’, ‘सिने लता’ इत्यादी. अर्थात या मधली बरीच थिएटरे आता झी सिनेमाचा भाग बनली आहेत. चाळीसच्या दशकातली ‘इडन’ पणजी, ‘सेंट्रल’, ‘दशरथ’ म्हापसा, ‘जनता टॉकीज’ केपे, ‘रेक्स’, ‘म्हाळसा’, ‘ऑलंपिया, मडगाव, ‘शांतादुर्गा’ कळंगुट ही नावे तर कुणाला आठवणारच नाहीत.

जुनेपुराणे स्वप्न-महाल 'सिनेमा थिएटर'
Gomantak Exclusive: मगोशी युतीचा मार्ग खुला

पूर्वीचा ‘प्रिंट’चा जमाना आज गेला आहे. आज सिनेमा डिजिटल माध्यमातून पडद्यावर प्रोजेक्ट होतो. जुन्या काळी कधीकधी तापलेल्या बल्बमुळे प्रिंट गरम होऊन वितळायची. त्यावेळी या वितळणाऱ्या प्रिंटबरोबर गुंडाळत गेल्यासारखा वाटणारा सिनेमाच्या हिरोचा चेहरा, त्यानंतरच्या थिएटरमधल्या शिट्ट्यांचा गदारोळ इत्यादी गमती आज अनुभवता येणार नाहीत. आज तर सिनेमा हातामधल्या मोबाईलवर आलाय. ‘सिनेमा’ आणि ‘पाहणारा’ इतक्याच आयामात राहून आज सिनेमा पाहिला जातो. नवीन मल्टिप्लेक्स तयार झाले आहेत, पण टिपिकल भारतीय मध्यमवर्गीय जनमानसाला ते अजून आपल्या मालकीचे मनोरंजन माध्यम वाटत नाही. परक्याच्या घरात जाऊन टीव्हीसमोर बसण्याचा तो काळ आठवतो? तसंच अजून मल्टिप्लेक्समध्ये वाटतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com