Miss World Reita Faria Powell : जगत सुंदरी

Miss World Reita Faria Powell आपल्या बोल्ड उत्तरांनी आणि फॅशनेबल स्टाईलने तिने भारतीय सौंदर्याचा झेंडा जगभर फडकवलाच, शिवाय महिला सक्षमीकरणाचा आदर्शही घालून दिला.
miss world Reita Faria Powell
miss world Reita Faria PowellDainik Gomantak
Published on
Updated on

आसावरी कुलकर्णी

भारतीय सौंदर्यवतींनी विश्वस्तरीय सौंदर्यस्पर्धांमध्ये यश मिळवलेलं आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अशा स्पर्धांमधून भाग घेणं मुलींसाठी कठीण होतं. भारतात मिस इंडिया स्पर्धा होऊ लागल्या होत्या.

परंतु जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धेत यश मिळत नव्हतं. तो मान मिळवला गोव्याच्या रिटा फारिया या मूळ गोमंतकीय कन्येने. रिटाचे आईवडील गोव्यातील होते. मुंबईमध्ये कामानिमित्त स्थायिक झाले. रिटाचा जन्म मुंबईतच झाला. जन्मजात लाभलेल्या ५ फूट ८ इंच उंचीमुळे तिला शाळेत नेहमी चिडवलं जायचं.

लांबुडग्या पायाची असं टोपण नाव तिला पडलं होतं. पण तिनं हिमतीने या सगळ्या टोमण्यांना तोंड दिलं आणि आपल्या उंचीचा वापर वेगवेगळ्या खेळांत केला. ती उत्तम खेळाडू होती. थ्रोबॉल, नेटबॉल आणि बॅडमिंटनपासून सर्व काही खेळायची. इव्हस विकली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेऊन ती जिंकल्यामुळे मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेण्यास ती पात्र ठरली.

या स्पर्धेत मिस बेस्ट स्विमिसूट आणि बेस्ट इव्हनिंग वेअर अशी पदकं तिला मिळाली आणि अर्थातच ती ही स्पर्धाही जिंकली. त्यावेळी ती फक्त भारतीयच नव्हे तर पूर्ण आशियामधली पहिली सौंदर्य स्पर्धा जिंकणारी मुलगी होती. सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या मुली शेवटी मॉडेलिंग आणि सिनेमामध्ये करिअर करतात. परंतु रिटा फारिया यांनी मात्र आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि डॉक्टर झाल्या. पुढच्या शिक्षणासाठी लंडनमध्ये गेल्यानंतर तिथेच त्यांनी विवाह केला आणि उभयता आयर्लंडमध्ये स्थायिक झाले.

रिटाची मिस वर्ल्ड बनण्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. १९६६ मध्ये ती मिस वर्ल्ड बनली. या विषयावर ती सांगते की, मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यान मला वाटलं होतं की, मी काहीतरी मोठं करणार आहे. या भावनेतून मी स्वत:वर विश्वास दाखवला आणि स्विमसूट घालून रॅम्पवर उतरले. आपल्या बोल्ड उत्तरांनी आणि फॅशनेबल स्टाईलने तिने भारतीय सौंदर्याचा झेंडा जगभर फडकवलाच, शिवाय महिला सक्षमीकरणाचा आदर्शही घालून दिला. त्या काळात आपल्या समाजात फॅशनला कमी महत्त्व दिलं जात होतं.

miss world Reita Faria Powell
Goa Police: 238 वॉरंट, 41 शस्त्रे जमा; गोवा पोलिसांची लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई

मिस वर्ल्डच्या ग्रँड फिनालेदरम्यान रिटाला डॉक्टर का व्हायचंय असं विचारलं असता ती म्हणाली, ''भारताला प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञांची गरज आहे. या उत्तरावर ज्युरी म्हणाली, ''भारतात अनेक मुलं जन्माला येतात'', त्यावर रिटा म्हणाली की, ''हेच आपल्याला कमी करायचं आहे...रिटा यांच्या उत्तराने संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

रिटा १९९८ मध्ये फेमिना मिस इंडियामध्ये जज होत्या. लंडनमध्ये झालेल्या १९७६ च्या मिस वर्ल्ड फायनलमध्ये डेमिस रौसोस सोबत त्या जज होत्या. एका वेगळ्या क्षेत्रात भारतीय मुलींना दार उघडून देणाऱ्या आणि ग्लेमरचा झगमगाट सोडून शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या रिटा फारिया आजही अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com