तेव्हा पर्रिकरांनी एकदाच चालवलेल्या स्कूटरने गोवेकरांना दिले चांगले रस्ते

सासष्टी भागातून वेगाने जाण्यासाठी पर्रिकरांनी स्कूटरचा वापर केला आणि तेव्हापासून लोकं पर्रिकरांना स्कूटरवाले मुख्यमंत्री म्हणू लागले.
Manohar Parrikar
Manohar ParrikarDainik Gomantak
Published on
Updated on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या साधेपणाची आणि त्यांच्या पेहरावाची मोठी चर्चा सातत्याने देशाच्या राजकारणात होत असते. त्यांच्या हाफ बाह्यांचा शर्ट आणि काळी पॅन्ट या पेहरावावरुन अनेकदा त्यांना VIP संस्कृती नसलेला मुख्यमंत्री म्हटले जाते. पण केजरीवाल यांच्या या साधेपणाच्याही आधी तब्बल 3 दशक गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या (Goa CM) साधेपणाची चर्चा देशाच्या राजकारणात होत असायची. या साध्या व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचे नाव म्हणजे गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar).

पर्रिकरांच्या साधेपणाच्या पेहरावाची, त्यांच्या अगदी सहजतेने कोणाच्याही स्कुटीवर मागे बसून जाण्याच्या सवयीची चर्चा गोव्यात कायम होत असायची. इतकी की लोक त्यांना 'स्कूटर वाले सीएम' देखील म्हणायचे. रस्त्याच्या कडेला चहा पिताना देखील अनेकदा पर्रिकरांना गोवेकरांनी पाहिले आहे. राज्यातील सगळी माहिती, हालहवाला आपल्याला या चहाच्या दुकानातच मिळतो असे पर्रिकरांचे मत होते. अशा या गोव्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रिकर यांचा आज स्मृतीदिन. 17 मार्च 2019 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी प्रदीर्घ लढा दिल्या नंतर पर्रिकर यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या चर्चा आजही देशाच्या आणि गोव्याच्या राजकारणात (Goa Politics) होतंच राहतात.

Manohar Parrikar
IIT मधून पदवीधर झालेले पहिले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रिकर हे सर्व सामान्यांचे राजकारणी आणि गोवेकरांचे आवडते मुख्यमंत्री म्हणून ओळखले जायचे. मुलाच्या लग्नातही हाफ बाह्यांचा शर्ट घालून आपल्या साधपणावर ठाम राहणारा माणूस म्हणून पर्रिकरांची ओळख गोवा राज्याच्या सीमेपलीकडील लोकांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झाली होती. असा माणूस जो कुठेही गेला तरी केवळ कोल्हापूरी चप्पल घालतो, अगदी संसदेतही ते कोल्हापूरी चप्पल घालून जात होते. मोठेपणा न करता एका सुरक्षा रक्षकासह पर्रिकर गोवा फिरायचे. (manohar parrikar on scooter)

पर्रिकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या प्रचारकापासून ते गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री बनले. राजकीयदृष्ट्या-अस्थिर असलेल्या किनारपट्टीच्या राज्यात पर्रिकर साधे जीवन जगले. पर्रिकर त्यांच्या स्कुटरमुळे अनेकदा चर्चेत असायचे. त्यांचा असाच एक किस्सा सांगितला जातो. एकदा पर्रिकर गोवा दौऱ्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत गाड्यांचा ताफा होता. सासष्टी तालुक्याची पाहणी पर्रिकर करत होते. आणि त्या भागातील रस्ता अरूंद होता. शिवाय खराबही होता. म्हणून त्या भागातून वेगाने जाण्यासाठी पर्रीकरांनी स्कूटरचा वापर केला आणि तेव्हापासून लोकं पर्रीकरांना स्कूटरवाले मुख्यमंत्री म्हणू लागले.

Manohar Parrikar
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या माहिती नसलेल्या काही गोष्टी

पर्रिकरांनी स्कूटर चालवल्यानंतर बोलताना ते म्हणाले, 'लोक मला विचारतात की मी आता स्कूटरने प्रवास करतो का. मी त्यांना सांगतो की मी आता स्कूटरने प्रवास काही करत नाही. कुठेतरी स्कूटर चालवली तर माझा अपघात होऊ शकतो, या भागात स्कूटरवर बसून प्रवास करणे किती कठीण आहे, हे मला कळले. लोकं स्कूटरने प्रवास करणे का टाळतात याचे उत्तर मला मिळाले. गोव्यातील रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी आणि या प्रक्रियेत होणारे मृत्यू कमी करण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करणार,' अशी घोषणा पर्रिकरांनी त्यावेळी स्कूटरच्या प्रसंगानंतर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com