

दत्ता दामोदर नायक
आंब्याचे झाड हा मुदितेचा दृश्यावतार आहे. हे आत्ममग्न, अंतर्मुख, सजग, संन्यस्त झाड कुठल्यातरी अनुपम आंतरिक आनंदाचा उपभोग घेत मग्न आहे असा भास मला होतो.
ह्या झाडाचा हा आंतरिक आनंद त्याच्या फळांच्या माधुर्यातून आपल्याला चाखायला मिळतो.
गोव्यात सुमारे ५००० हेक्टर जमिनीत आंब्याची लागवड आहे. प्रति हेक्टर उत्पादकता २.२ टनाची असल्यामुळे गोव्यातील आंब्याचे वार्षिक उत्पादन ११००० टन आहे. कोकणात हापूस आंब्याची संघटित, व्यापारी तत्त्वावर लागवड केली आहे.
गोव्यात त्या पद्धतीने आंब्याची लागवड केलेली नाही. गोव्यातील बागायतदार आपल्या जमिनीत आंबा हौशेने लावतो. आंब्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे. आंब्याचे दर कधी कधी आकाशात भिडतात.
गोव्यात पिकणारा आंबा स्थानिक मागणीही पुरी करू शकत नाही. त्यामुळे कोकणाप्रमाणे गोव्यातून आंब्याची निर्यात होत नाही. गोव्यात आंब्याच्या मालकुराद (मानकुराद), मोंसरात, फेर्नांद, मांगिलाल, माल्गेश, झेवियर, कुलास, फुर्ताद, साकरी, कारेल, बिशप, कॉश्ता अशा अनेक प्रजाती आहेत.
गदान आहे ही गोष्ट विसरता येणार नाही. आंबा, काजू, मिरची, अननस, कलिंगड ही पिके पोर्तुगीजांनी गोव्यात आणली. त्यामुळे गोमंतकीय शेतीचा Landscape बदलून गेला.
पोर्तुगीजांच्या ह्या योगदानाबद्दल (शिवाय सती पद्धतीवर बंदी, बेकरीचा व्यवसाय) पोर्तुगीजांना लाख गुन्हे माफ आहेत!आंब्यापासून आमरस, मुरांबे, आम्रखंड, लोणची, आईस्क्रीम वगैरे पदार्थ बनतात.
आंबा हे स्वादिष्ट, पौष्टिक व चौरस फळ आहे. पोर्तुगीजांनी केलेली आंबा डिप्लोमसी इतिहासात प्रसिद्ध आहे. पोर्तुगीज पेशव्यांना उत्तमोत्तम कलमी आंबे व मद्य पाठवत असत. पोर्तुगीज व्हाईसरॉय मुगलांना, विजयनगरच्या राजांना आंबे पाठवून त्यांच्याकडचे संबंध 'गोड' करत असे.
त्या दृष्टीने गोवा ४५१ वर्षे पारतंत्र्यात राहिला याचा दोष आंब्याकडेही येतो. आंब्याचे झाड हे फार प्राचीन, पुरातन झाड आहे.
वेद, उपनिषदे, बौद्ध साहित्य यांत आंब्याचा पदोपदी उल्लेख होतो. आंब्याचे झाड भारतवर्षात सर्वत्र पसरलेले आहे. उत्तर प्रदेशात दशहरी, लंगडा, आंध्रप्रदेशात नीलम, तोतापुरी, बिहारात सिंघुराई, बंगालात मालडा अशा आंब्याच्या उपजाती आहेत.
माझ्या लहानपणी आमच्या घरात वैशाख महिन्यात 'आंब्याची समराधना' केली जाई. आमरस पुरी, घोंटांचे सांसव, कैरीची उडदमेथी आणि भरपूर आंबे असा बेत असे. पुढे मी नास्तिक झालो. अधार्मिक झालो. पण लहानपणच्या 'आंब्याच्या समराधनेतले' स्मृतिसुख मी कधीच विसरलो नाही.आंब्याच्या पानांचे तोरण ही सुंदर सांस्कृतिक संकल्पना आहे.
फाल्गुनात मोहरून आलेले आंब्याचे झाड नितांत सुंदर दिसते. आंब्याचे झाड तृप्त, संतृप्त समाधानाने बुडलेले असते. आंब्याचे झाड पाहिले की मला बुद्धाच्या 'मुदिते'ची आठवण येते. आंब्याचे झाड हा मुदितेचा दृश्यावतार आहे.
हे आत्ममग्न, अंतर्मुख, सजग, संन्यस्त झाड कुठल्यातरी अनुपम आंतरिक आनंदाचा उपभोग घेत मग्न आहे असा भास मला होतो. ह्या झाडाचा हा आंतरिक आनंद त्याच्या फळांच्या माधुर्यातून आपल्याला चाखायला मिळतो. आंब्याने माधुर्याला अधिक मधुर बनवले आहे. आपल्या समुधर फळांच्या रसातून आंब्याचे झाड आपली मुदिता मुक्तहस्ताने आमच्या ओंजळीत टाकत असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.