चला पुन्हा मैदानात उतरा 'Goal Goa'

गोव्यात फुटबॉलचा विकास कसा होईल व वर्ल्डकपची स्वप्नपूर्ती वास्तवात करता येईल का याचा शोध हा लघुपट घेण्याचा प्रयत्न करतो.
चला पुन्हा मैदानात उतरा 'गोल गोवा'
चला पुन्हा मैदानात उतरा 'गोल गोवा'Dainik Gomantak
Published on
Updated on

अस्सल गोमंतकीय असलेल्या या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात झाले आहे. त्याचे निर्माते फुटबॉल खेळाडू रेमी फर्नांडीस आहेत. मोरजी गावचे रेमी यांचे, फुटबॉल खेळणे, समुद्रकिनाऱ्यावर बागडणे, मासे मारणे हे आवडते छंद. कोरोनामुळे उद्भवलेल्या मन:स्थितीतून बाहेर कसे पडावे हा विचार त्यांना सतावत होता याच दरम्यान या लघुपटाच्या दिग्दर्शिका लिझा हेईडलोफ या देखील गोव्यात अडकून पडल्या होत्या. अशा वेळी रेमी यांनी आपली अस्वस्थता लिझाकडे व्यक्त करताच लघुपट निर्मितीवर एकमत झाले आणि रेमीला फुटबॉलचे वेध लागले असल्याने, फुटबॉल याच विषयावर लघुपट निर्मिती करावी हे पक्के झाले. भर पावसाळ्यात चित्रिकरणाला सुरवात झाली व दीड महिन्यात तो तयार झाला. गोव्यात फुटबॉलची सुरवात कशी झाली पासून गोव्यातील महिला फुटबॉलपटू राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायला कशा पुढे आल्या अशी रुपरेषा यात आहे व यातून मुलांना, "चला पुन्हा मैदानात उतरा" हा संदेश देण्यात आला आहे.

गोव्यात ज्यांनी फुटबॉल जोपासला अशा, भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर, धेंपे फुटबॉल अकादमीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, राष्ट्रीय फुटबॉल संघाचे तांत्रिक संचालक सविओ मेंडेरा, भारतीय महिला संघाच्या माजी प्रशिक्षक मेमॉल रॉकी, आंतरराष्ट्रीय खेळाडू व फिफा पंच उवेना फर्नांडीस आदी नामवंतांचा या लघुपटात समावेश आहे. बॉक्स फुटबॉल हा खेळ प्रत्येक गोमंतकीयाच्या रक्तात भिनला आहे. गोव्यात फुटबॉलचा विकास कसा होईल व वर्ल्डकपची स्वप्नपूर्ती वास्तवात करता येईल  का याचा शोध हा लघुपट घेण्याचा प्रयत्न करतो. लिसा हेईडलोफ - दिग्दर्शक  बॉक्स    हा लघुपट दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वा. प्रक्षेपित होणार आहे.

चला पुन्हा मैदानात उतरा 'गोल गोवा'
मोरजी समुद्रकिनाऱ्यावरच्या मोकळ्या जागेत प्रदर्शित होणार 'गोल गोवा'

कोरोना महामारी काळात फुटबॉल मैदाने ओस पडली होती. फुटबॉल मैदानावरच लसीकरण चालायचे. या पार्श्वभूमीवर तरुणांनी पुढील आव्हाने पेलण्यासाठी कौशल्य आत्मसात करून पुन्हा नव्याजोमाने फुटबॉल मैदानात उतरावे या आशयाच्या, 'गोल गोवा' या नवीन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा मोरजी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या प्रीमियरला. चांगला प्रतिसाद मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com