गोव्याच्या इतिहासात लीना आणि सिध्दार्थ

सिध्दार्थ बांदोडकर यांनी 8 डिसेंबर 1975 रोजी मुंबई येथे हिंदी चित्रपट अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी विवाह केला.
Leena and Siddharth
Leena and SiddharthDainik Gomantak
Published on
Updated on

प्रजल साखरदांडे

गोवा: आल्तिन्हो येथील निवासस्थानी लीना आणि सिध्दार्थ पणजी येथे मुक्तिदिनाच्या समारंभाच्या पूर्वसंध्येला रेड आणि ब्लॅक डान्समध्ये सहभागी होण्यासाठी तयारी करत असताना अचानक सिध्दार्थ आपल्या विजारीच्या खिशात कायम बाळगत असलेल्या बंदुकीतून गोळी सुटली

लग्न एका परीकथेतील लग्नाप्रमाणे होते. वर्ष होते 1975. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे कर्तृत्ववान आणि एकुलते एक सुपूत्र त्याचप्रमाणे गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांचे बंधू सिध्दार्थ बांदोडकर यांनी 8 डिसेंबर 1975 रोजी मुंबई येथे हिंदी चित्रपट अभिनेत्री लीना चंदावरकर यांच्याशी विवाह केला. ही घटना राष्ट्रीय पातळीवरच्या बातम्यांमध्ये प्रसिध्द झाली.

Leena and Siddharth
मोपा लिंक रोडमुळे पिडीत शेतकऱ्यांना लढ्यात सामिल होण्याचे आवाहन

दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर आणि सुनंदाबाई यांना शशिकलाताई काकोडकर, उषा वेंगुर्लेकर, क्रांती राव आणि ज्योती बांदेकर अशा चार मुली होत्या आणि सिद्धार्थ हा त्यांचा वाचून जगलेला एकुलता एक लाडका मुलगा होता. त्यांचे इतर मुलगे लहानपणीच वारले.

सिध्दार्थ तरुण होते. वयाच्या केवळ 25 व्या वर्षी एक आश्वासक उद्योगपती, खाण मालक, आपल्या वडिलांप्रमाणेच उदार आणि पुढे उज्ज्वल कारकीर्द असलेला एक सुंदर तरुण, असे त्यांचे वर्णन त्या काळी प्रसिध्द होते. लीना या 70 च्या दशकाच्या सुरुवातीच्या प्रसिध्द सिनेतारका होत्या. त्यांनी ‘मनचली’, ‘हमजोली’, ‘मैं सुंदर हूं’, ‘बिदाई’, ‘कैद’, ‘हनीमून’, ‘रखवाला’ यांसारख्या प्रसिध्द चित्रपटांमध्ये काम केले होते.

70 च्या दशकाच्या सुरुवातीला प्रसिध्द झालेल्या 'हमजोली' या हिट चित्रपटात त्यांनी जितेंद्रसोबत काम केले होते. त्या चित्रपटातील "ढल गया दिन" या बॅडमिंटन खेळताना चित्रीकरण केलेल्या गाण्यासाठी त्या आजही प्रसिद्ध आहेत.

लीना चंदावरकर या सिने सृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी धारवाड येथे राहायच्या. 1968-69साली सुनील दत्त यांच्या 'मन का मीत' या चित्रपटातून त्यांनी सिने- सृष्टीत पदार्पण केले होते. राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, दिलीप कुमार यांसारख्या सर्व प्रसिध्द कलाकारांसह काम करताना त्यांना पटकन प्रसिध्दी लाभली. पण देखण्या सिध्दार्थशी लग्न करण्यासाठी त्यांनी त्या रूपेरी जगाचा निरोप घेतला.

29 सप्टेंबर 1976 रोजी त्यांचा साखरपुडा झाला होता. गोमंतकीय आपल्या लाडक्या ‘बाबूचे’ लीनाशी होणारे लग्न पाहण्यासाठी उत्सुक होते. लीना यांना ‘बैराग’, ‘झालिम’, ‘नालायक’, ‘आखिरी गोली’, ‘डाकू और जवान’, ‘अपने रंग हजार’, ‘जग्गू’ आणि असे इतर काही चित्रपट पूर्ण करायचे होते. त्यामुळे त्यांचे लग्न 8 डिसेंबर 1976 रोजी पार पाडावे, असे ठरविण्यात आले. शेवटी तो दिवस उजाडला आणि सिध्दार्थ आणि लीनाचे लग्न झाले. लीना चंदावरकर यांचे नाव अनुराधा बांदोडकर असे ठेवण्यात आले. सर्व वृत्तपत्रांनी या नवविवाहित जोडप्याची आकर्षक छायाचित्रे मुखपृष्ठावर छापली होती.

Leena and Siddharth
‘देवा श्री रामनाथा’ भक्तिगीतांच्या अल्बमचे लोकार्पण मंगळवारी होणार

15 डिसेंबर 1976 रोजी पणजी येथील चिल्ड्रन पार्कमध्ये बांदोडकर कुटुंबीय आणि सिध्दार्थ यांच्या थोरल्या भगिनी आणि गोव्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी एक भव्य स्वागत समारंभ (रिसेप्शन) आयोजित केला होता.

पण हे सर्व अल्पायुषी ठरले. 18 डिसेंबर 1976 रोजी आल्तिन्हो येथील निवासस्थानी लीना आणि सिध्दार्थ पणजी येथे आयोजित मुक्तिदिनाच्या समारंभाच्या पूर्वसंध्येला रेड आणि ब्लॅक डान्समध्ये सहभागी होण्यासाठी तयारी करत असताना अचानक सिध्दार्थ आपल्या विजारीच्या खिशात कायम बाळगत असलेल्या बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी सिध्दार्थ यांच्या पोटातून त्यांची पाणथरी छेदून पार झाली.

रक्ताच्या थारोळ्यातील सिद्धार्थ यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे नेण्यात आले आणि तेथून त्यांना मुंबईतील जसलोक येथे हलविण्यात आले. मृत्यूशी प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर सिध्दार्थ बरे होऊन घरी परतले आणि संपूर्ण गोमंतकीयांचा जीव भांड्यात पडला. परंतु, दैव काही वेगळेच फासे टाकत होते. ऑक्टोबर 1976 मध्ये सिध्दार्थ यांच्या वाढदिवशी पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तातडीने मुंबईतील जसलोकमध्ये हलविण्यात आले. 7 नोव्हेंबर 1976 रोजी मृत्यूशी झुंजणाऱ्या केवळ 26 वर्षांच्या या गोमंतकीय सुपुत्राचे निधन झाले. ही बातमी रेडिओवर जाहीर होताच संपूर्ण गोवा हळहळला. 12 ऑगस्ट 1973 रोजी भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन होऊन अवघ्या तीन वर्षांच्या आत त्यांच्या एकुलत्या एक मुलाचेही निधन झाले. बांदोडकर कुटुंबीयांसाठी ही एक गंभीर शोकांतिका होती.

Leena and Siddharth
1 मार्च रोजी फोंड्यात कार्निव्हल परेडचे आयोजन

8 नोव्हेंबर 1976 रोजी मुसळधार पावसात सिध्दार्थ यांच्या पार्थिवावर दोनापावल येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जणू स्वर्गसुध्दा त्या दिवशी रडत होता. संपूर्ण गोवा ठप्प झाला होता. सर्व आस्थापने बंद ठेवण्यात आली होती.

दोनापावल येथे सिध्दार्थ यांना समर्पित केलेले स्मारक आहे. आणि शेजारीच त्यांची आई सुनंदाबाई यांचेही स्मारक आहे. शशिकलाताईंनी आपल्या लाडक्या बंधूच्या स्मरणार्थ सिध्दार्थ भवन बांधले.

सिद्धार्थ अनेक सामाजिक संस्थांशी संबंधित होते. गोमंतकीय त्यांना प्रेमाने "बाबू" असेच संबोधायचे. गोमंतकीयांचा लाडका बाबू आजही त्यांच्या स्मृतींमध्ये जीवंत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com