गोव्यातील पहिली आर्ट थेरपिस्ट लक्ष्मी प्रभू

चित्रकलेची शिक्षिका असलेली लक्ष्मी योगायोगानेच आर्ट थेरपिस्ट (Art Therapist) बनली.
गोव्यातील पहिली आर्ट थेरपिस्ट लक्ष्मी प्रभू

गोव्यातील पहिली आर्ट थेरपिस्ट लक्ष्मी प्रभू

Dainik Gomantak 

Published on
Updated on

चित्रकलेचे शिक्षक तुम्हाला रंग-रेषांबरोबर कसे खेळावे हे शिकवू शकतात. एखादा आर्ट थेरेपिस्ट मात्र, या रंग-रेषांबरोबर तुम्ही खेळताना, तुम्हाला तुमच्या मानसिक जखमा ओळखायला मदत करू शकतो. या जखमा नंतर मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने कोणत्याही औषधाशिवाय तुम्ही भरून काढू शकता. आपल्या जखमा योग्यवेळी ओळखणे खूप महत्त्वाचे आहे.

लक्ष्मी प्रभू (Lakshmi Prabhu) तुम्हाला तुमच्या मानसिक जमा ओळखायला मदत करते. ती गोव्यातली (Goa) पहिली आणि एकमेव आर्ट थेरपिस्ट आहे. चित्रकलेची शिक्षिका असलेली लक्ष्मी योगायोगानेच आर्ट थेरपिस्ट (Art Therapist) बनली. ‘गोवा कॉलेज ऑफ फाइन आर्ट’मधून (Goa College of Fine Arts) पदवी मिळवल्यानंतर लक्ष्मीने प्रथम एका जाहिरात एजन्सीसाठी काम केले. त्यानंतर तिने मुंबईला जाऊन फॅशन फोटोग्राफीचा कोर्सही पूर्ण केला. त्यानंतर ती गोव्यात चित्रकलेची शिक्षिका म्हणून काम करायला लागली पण वैयक्तिक कारणांमुळे काही वर्षानंतर तिला ते काम सोडावे लागले.

2020 साल सर्वांसाठी क्लेशदायक वर्ष ठरले. अचानक आलेल्या कोरोनाने (Corona) जगभर साऱ्यांच्याच मनोवृत्तीवर आघात केला. त्याच दरम्यान डिसेंबरमध्ये लक्ष्मीने आपला आर्ट थेरपीचा ऑनलाईन कोर्स (Online Course) पूर्ण केला होता. तिचे वडीलही याच काळात वारले. लक्ष्मीने आत्मसात केलेली ‘आर्ट थेरपी’ तिच्या स्वत:च्या यावेळी मदतीला आली. वडिलांच्या जाण्यानंतर आलेल्या ताण-तणावावर, चिंतेवर आणि भितीवर ती तिच्या मदतीने मात करू शकली.

<div class="paragraphs"><p>गोव्यातील पहिली आर्ट थेरपिस्ट लक्ष्मी प्रभू</p></div>
साळावलीचे बोटॅनिकल गार्डन बनले आकर्षणाचे केंद्र

काय आहे ही ‘आर्ट थेरपी’?

‘आर्ट थेरपी’ हे केवळ आपल्या क्लायंटला समजून घेण्याचे तंत्र नाही किंवा `तो कला संबंधित सूचनांचा संचही नाही. दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या ‘कला उपचार’ पद्धती अस्तित्वात आहेत. एक ‘कला’ (Art) जी चिकित्सा करते आणि दुसरी, जी मानसोपचार करते. पहिली मानते की आनंद प्राप्त करण्याच्या उद्देशाने कलानिर्मितीत आत्ममग्न राहणे हे एकापरीने उपचारात्मक असते तर दुसरी, क्लायंटच्या मानसिक वृत्ती सुधारण्यासाठी मानसोपचारांच्या मार्गावरच्या, थेरपिस्ट आणि क्लाइंटमधल्या नात्याच्या अपरिहार्यतेवर विश्वास करते.

‘आर्ट थेरपी’मध्ये लाभणारे फायदे हे सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे मनाला मोकळे करत मिळवले जातात. सर्व वयांचे लोक या थेरपीचा लाभ घेऊ शकतात. ‘आर्ट थेरपी’ वैयक्तिक समस्या सोडवण्यास मदत करतात. एकाकीपणाच्या भावनांवर मात करणे, भावनिक आधार लाभणे, निरोगीपणाची भावना तयार होणे, वेदना व्यवस्थापनात मदत होणे, स्वतःत बदल घडवून आणणे, भोवताल सकारात्मक बनवणे, आत्मविश्वास वाढणे इत्यादी फायदे आपल्याला ‘आर्ट थेरपी’द्वारे मिळू शकतात.

कुठल्याही थेरपीत सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ‘करुणा’. या प्रक्रियेत ‘करुणे’शिवाय इतरांचे घाव समजून घेणे, धोक्याच्या जागा ओळखणे, समस्यांचे निराकरण करणे असंभव आहे आणि ‘आर्ट थेरपी’त प्रामुख्याने ‘करूणा’ या भावनेचा कस लावूनच क्लाइंटची मानसिकता समजून घेतली जाते.

कलाशिक्षक असलेली लक्ष्मी प्रभू आता कला चिकित्सक बनून मानोपसाराच्या प्रक्रियेतल्या, प्राथमिक स्तरावर क्लायंटच्या जखमा ओळखण्यास सिद्ध झाली आहे. ती म्हणते, संगीत (Music) , गायन (Singing) यांच्यासारखीच ‘आर्ट थेरपी’ (Art Therapy) देखील मानसिक उपचारांच्या प्रक्रियेतील नॉन-क्लिनिकल मार्ग आहे. भय आणि स्वास्थ्य या दोन टोकांमधील पूल म्हणजेच ‘आर्ट थेरपी’!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com