कर्नाटकातील बेलूर शहरातील एका छोट्या चर्चमध्ये हिंदू जागरुकांच्या एका गटाने जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप करून एक आठवडा उलटला आहे. परंतु जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. बेंगळुरूपासून पाच तासांच्या अंतरावर असलेल्या "लाइफ टू द नेशन्स मिनिस्ट्रीज" या चर्चमध्ये ही घटना घडली. 28 नोव्हेंबर रोजी प्रार्थना सभा सुरू असताना बजरंग दलाचे सुमारे 25 कार्यकर्ते चर्चमध्ये घुसले. आक्रमकांवर कारवाई करण्याऐवजी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावलेले पोलिस बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी वाटाघाटी करताना दिसले.
दरम्यान या घटनेचे पडसाद आंतररार्ष्ट्रीय स्तरावर उमटण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यात ख्रिसमसची लगबग असते समस्त ख्रिश्चन धर्मीय जनता हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आणि याच दरम्यान हि घटना घडल्याने ख्रिस्ती बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मात्र येशूंनी दिलेली शिकवण ख्रिस्ती बांधव विसरले नाहीत म्हणून त्यांनी दंगा किंवा आंदोलन करून या घटनेचा निशेध न करता कायदेशीर प्रक्रियेद्वारे या घटनेची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. ऐन ख्रिसमसच्या आणि आनंदाच्या वेळी कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळी असे कृत्य घडल्यास त्याची दखल आंतररार्ष्ट्रीय स्तरावरही घेतली जाते. गोव्यात कॅथलिकांची सख्या जास्त आहे. आणि गोवा राज्य कर्नाटकपासून जवळ आहे. तेव्हा या घटनेचा गोव्यात काय परिणाम झाला असा प्रश्न उपस्थित होणे सहाजिक आहे. गोव्यात ख्रिसमस साजरा करण्यासाठी पर्यटक जगभरातून येतात. गोव्यातील चर्च या दिवशी लख्ख प्रकाशाने उजळून निघतात.
मात्र राज्यातील ख्रिश्चन समुदायांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी हुबळी येथील सेंट पीटर चर्च कॅम्पस येथे शांततापूर्ण निषेध मोर्चा काढण्यात आला असल्याचे हुबळी-धारवाड ख्रिश्चन समाजाचे अध्यक्ष सुनील महाडे यांनी सांगितले . राज्यातील चर्चचे सर्वेक्षण करण्याच्या सरकारच्या निर्णयालाही आमचा विरोध राहणार असल्याचे त्यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. धार्मिक आचरण हा आपला संविधानिक अधिकार आहे. मात्र सरकारने आता अधिकृत आणि अनधिकृत चर्चचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, या कारवाईमुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. ख्रिश्चन समुदाय हजारो वर्षांपासून भारतात आहेत. इतरांप्रमाणेच आपला धर्म पाळण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे. आम्ही जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात लोकांचे धर्मांतर करत असल्याचा आरोप काही आमदार करत होते, मात्र हे सर्व आरोप निराधार असून आम्ही कुणावरही जबरदस्ती करत नाही किंवा धर्मांतर करत नाही, असे ते म्हणाले.
नवानगर येथे नुकत्याच घडलेल्या घटनेदरम्यान नुकताच ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या सोमलिंग अवराडी यांच्यावर प्रार्थना करत असताना हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध करत आणि या घटनेमागे कोण आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी गोव्यातून ख्रिश्चन समाजाचे अध्यक्ष सुनील महाडे यांनी केली. आता या घटनेचा फायदा घेवून सत्ताधारी नेते राजकारण करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण भारतीय राजकारणात नेहमीच धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण केलं जात हे उघड सत्य आहे. गोव्यातील कॅथलिक जनतेच्या मतदानासाठी या घटनेचा फायदा होणार नाही हे कशावरून? कारण गोव्यात आगामी दोन महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. आणि राज्यात प्रचाराचे आश्वासंनांचे जोरदार वारेही वाहत आहे. तेव्हा कॅथलिकांना दिलासा देत राजकारणी मतांचा स्वार्थासाठी या घटनेचा फायदा करून घेवू शकतात.
डिसेंबर 2014 मध्ये अनेक ख्रिश्चन धर्मगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. 25 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशात 'सुशासन दिन' साजरा केला जातो. सरकारमधील उत्तरदायित्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी या दिवसाची स्थापना करण्यात आली होती. आणि सुशासन दिन हा सरकारसाठी कामकाजाचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीतील अनेक चर्चची तोडफोड करण्यात आली होती आणि ख्रिश्चन पाद्री घाबरले होते. दरम्यान नवी दिल्लीत पाडले गेलेले चर्च आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांची त्याचवेळी गोवा भेट हा विरोधकांसाठी आयता विषय झाला होता. काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केजरीवाल यांना या मुद्द्यावर खिंडीत पकडताना केजरीवाल गोव्यात येऊनही चर्चेस मोडू पाहतात का, असा सवाल उपस्थित केला होता.
आता पुन्हा एकदा दक्षिण कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात चर्चची तोडफोड करण्यात आली. 160 वर्षे जुन्या सेंट जोसेफ चर्चमध्ये ही घटना घडली. सेंट अँथनी यांचा पुतळा तोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना राज्याची राजधानी बेंगळुरूपासून सुमारे 65 किमी अंतरावर असलेल्या सुसाईपल्या येथे घडली. चर्चच्या सदस्यांनी जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपांचे खंडन करत "आम्ही जबरदस्तीने धर्मांतर का करावे? आम्ही देवाची उपासना करत आहोत. जबरदस्तीने धर्मांतर करून काय फायदा? त्यांच्या कृतीमुळे आम्हाला दुःख झाले. माझा धर्मावर विश्वास आहे आणि मला ख्रिश्चन व्हायचे आहे, हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि तो माझा अधिकार आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी प्रार्थना सभेचा भाग आहे. कोणीही माझ्यावर जबरदस्ती केली नाही. चर्चमध्ये येण्याचा माझा ऐच्छिक निर्णय आहे," वादाच्या दिवशी उपस्थित असलेल्या सुनिताने अशी माहिती माध्यमांना दिली होती. चर्चचे पाद्री सुरेश पॉल यांनीही हा आरोप फेटाळून लावला होता.
आता चर्चवरील हल्ला अशा वेळी करण्यात आला जेव्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात धर्मांतर विरोधी विधेयक आणण्याचे आश्वासन दिले. विधानसभेच्या चालू अधिवेशनात एक नवीन विधेयक सादर करण्यात आले आहे. ज्याचे नाव आहे कर्नाटक स्वातंत्र्य हक्क संरक्षण विधेयक असे आहे. सक्तीचे धर्मांतर रोखणे हा या विधेयकाचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु टीकाकारांचे म्हणणे आहे की ते राज्यातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहे. आणि त्यामुळे या विधेयकाविरोधात राज्यात निदर्शने सुरू आहेत. कर्नाटक विधानसभेत भाजप सरकारने विधेयक मांडण्यापूर्वीच, विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी हे विधेयक धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देणार्या संविधानाच्या विरोधात असल्याचे म्हणत आहे. कलम पंचविस केवळ ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आणले गेले आहे. असे विरोधी पक्ष नेत्यांचे म्हणणे आहे. जबरदस्तीने धर्मांतराला दंडित करण्यासाठी कायदा आणणारे हे नववे राज्य आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2021 पर्यंत कायदा नसताना ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांवर हल्ल्याच्या 39 घटना घडल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.